मुंबई – शिवसेना (shivsena) नेते व मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (yashwant jadhav) त्यांच्या पत्नी आमदार यामिनी यशवंत जाधव (yamini jadhav) १०० कोटींचा घोटाळा केला आहे. त्यामुळे आयकर विभागाने करोडो रुपयांची रोख रक्कम आणि 10 बँक लॉकर्स जप्त केले आहेत. फिक्सर विमल अग्रवाल आणि मुंबई महापालिकेचे ५ कंत्राटदार आणि यशवंत जाधव कुटुंबीयांच्या ३३ जागांवर छापे सुरू असल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितले आहे. आजचा तीसरा दिवस असल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या होत्या. कारण नेमकी कशाची चौकशी सुरू आहे हे कोणालाचं माहित होतं नव्हते. किरीट सोमय्यांनी आयकर विभाग काय करतंय हे सांगितल्याने त्यांच्यावर आता कोणती कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यशवंत जाधव यांच्या माझगाव घराबाहेर मागील तीन दिवसांपासून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून तिथं शिवसैनिक आक्रमक झाल्याचे देखील पाहायला मिळाले होते.
चौकशीचा तिसरा दिवस
नवाब मलिकांना ईडी ताब्यात घेतल्यापासून महाराष्ट्रातल राजकारण अधिक गरम झालं आहे. त्यामुळे रोज नव्या घडामोडी समोर येत आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी भाजपाचं सरकार केंद्र सरकारमधील यंत्रणा अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापर करीत आहे. तसेच भाजपा नवाब मलिकांनी गुन्हा केल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असले असल्याचे म्हणत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी निषेध नोंदवला जातं आहे. नवाब मलिकांना ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने छापे मारी सुरू केली आहे. ती मागच्या तीन दिवसांपासून सुरू असल्याने अनेकांना नेमकी कशाची चौकशी सुरू आहे अशी शंका होती. तसेच माझगाव येथील जाधवांच्या घराबाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोणतंही कारण अद्याप आयकर विभागाने सांगितलेलं नाही. यशवंत जाधव यांनी भ्रष्टाचार केला असून त्यातून मिळालेली रक्कम परदेशात लपवली असल्याचा त्यांच्यावरती आरोप होता.
शिवसैनिक आक्रमक
मागीत तीन दिवसांपासून यशवंत जाधव यांच्या घरासमोर अनेक शिवसैनिक बसले आहेत. तिथं त्यांनी ठिय्या मांडला असून घोषणाबाजी देखील केली. तसेच भाजपाचं सरकार मुद्दाम केंद्रीय यंत्रणाचा वापर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देत आहे असं तिथल्या शिवसैनिकांनी सांगितलं. पोलिसांनी अनेकदा तिथल्या शिवसैनिकांची समजूत काढली आहे, त्याचबरोबर आयकर विभागाचे अनेक अधिकारी मागच्या तीन दिवसांपासून घरातचं आहेत. किरीट सोमय्यांनी नेमका कशाचा तपास करीत आहेत हे सांगितल्याने अनेका आच्छर्य वाटेल. कारण किरीट सोमय्यांनी सांगितल्याप्रमाणे आयकर विभागाने आत्तापर्यंत कोणतीही गोष्ट सार्वजनिक केलेली नाही.