आदित्य ठाकरेंच्या बर्थ डेनिमित्त सेनेच्या सर्व आमदारांना ‘मातोश्री’चा निरोप
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेना आमदार बर्थ डे गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आमदारांना 'मातोश्री'वर हजर राहण्याचा निरोप धाडण्यात आला आहे.
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेना आमदार बर्थ डे गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आमदारांना ‘मातोश्री’वर हजर राहण्याचा निरोप धाडण्यात आला आहे. विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व आमदारांना निरोप देण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी पहिल्यांदाच सर्व शिवसेना आमदारांकडून आग्रह होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांना कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रह होऊ शकतो.
आदित्य ठाकरे यांचा आज 29 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या शुभेच्छा फलकांवरही आदित्य ठाकरे यांना निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर शिवसेनेच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद आलं तर आदित्य ठाकरेंचं नाव त्यासाठी असू शकतं, अशीही चर्चा रंगली. या सर्व पार्श्वभूमीनंतर आदित्य ठाकरेंसाठी वरळी आणि शिवडी या दोन विधानसभा मतदारसंघांची चाचपणीही झाली.
वाचा EXCLUSIVE : तुम्ही निवडणूक लढणार का? आदित्य ठाकरे म्हणतात…
आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या सर्व आमदारांना मातोश्रीवर बोलावल्यानंतर, आदित्य ठाकरेंच्या संसदीय राजकारणाबाबत काही निर्णय होतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
‘महाराष्ट्र वाट पाहतोय’
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेकडून त्यांना शुभेच्छा देणारे फलक उभे करण्यात आले आहेत. सोशल मीडियावरुन आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवून, राज्याचं नेतृत्व करण्यासाठी गळ घातली जात आहे. “हीच वेळ आहे, हीच संधी आहे, महाराष्ट्र वाट पाहतोय” असा आशय आणि त्यावर आदित्य ठाकरे यांचा फोटो, असे पोस्टर सध्या सोशल मीडियावर शेअर केले जात आहे. युवासेनेचे कोषाध्यक्ष असलेल्या अमेय घोले यांनीच असे पोस्टर्स शेअर केले आहेत.
संबंधित बातम्या
आधी डिनर, आता एकाच दिवशी बर्थ डे, आदित्य ठाकरे-दिशा पटाणीचा योगायोग
दोन मतदारसंघांची चाचपणी, मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने आदित्य विधानसभेच्या रिंगणात?
हीच वेळ, हीच संधी, महाराष्ट्र वाट पाहतोय, आदित्य ठाकरेंसाठी मोर्चेबांधणी सुरु
महाराष्ट्र आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारेल : संजय राऊत
आदित्य ठाकरेंकडून विधानसभेसाठी या दोन मतदारसंघांची चाचपणी?
EXCLUSIVE : तुम्ही निवडणूक लढणार का? आदित्य ठाकरे म्हणतात…
स्पेशल रिपोर्ट : वांद्रे ते वरळी, आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघ कोण सोडणार?