Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरे यांनी मंत्रिमंडळातील आवडता मंत्री सांगितला!

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची आज पुरंदर तालुक्यातील हवेली विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा झाली.

आदित्य ठाकरे यांनी मंत्रिमंडळातील आवडता मंत्री सांगितला!
Follow us
| Updated on: Oct 18, 2019 | 3:01 PM

पुणे : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची आज पुरंदर तालुक्यातील हवेली विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा झाली. या सभेत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मंत्रिमंडळातील आवडता मंत्री सांगितला. शिवसेनेचे हवेलीचे आमदार आणि विद्यमान मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे आपले आवडते मंत्री असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे आज फुरसुंगीत उपस्थित होते. आदित्य ठाकरे म्हणाले, “विजय शिवतारे यांना  2014 मध्ये मोठी जबाबदारी दिली. आता मुख्यमंत्र्यांनीही त्यांना शब्द दिला आहे. त्यामुळे मला बोलायची गरज नाही. विजय शिवतारे यांनी आपल्या मतदारसंघात 10 हजार कोटी खर्च केले आहेत. मुख्यमंत्र्यांनीही आपल्या मतदारसंघात एवढा खर्च केला नसेल. मंत्रिमंडळातील सर्वात आवडते मंत्री विजय शिवतारे आहेत. विजय शिवतारे यांना जे काही मिळेल ते उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री ठरवतील, जे काही मिळेल ते चांगले मिळेल”

वरळीकर मला विधानसभत पाठवणार

“तुमचा आशीर्वाद घेऊन मी येथून जाणार आहे. वरळीकर मला विधानसभेत पाठवणार आहेत. 21 तारखेला मला आशीर्वाद द्या. माझं स्वप्न नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र मला घडवायचा आहे, हिरवा महाराष्ट्र घडवायचा आहे, आम्ही वचन देतो ती पूर्णही करतो. आम्हाला कर्जमाफी नको कर्जमुक्ती हवी आहे. 15 दिवसात विमा कंपन्यानी शेतकऱ्यांचे पैसे दिले, महाराष्ट्रात अभ्यासाचा दर्जा एकसारखा पाहिजे, महाराष्ट्रात अडीच हजार विद्यार्थी बसेस मला आणायच्या आहेत. महाराष्टात मला फिरतं हॉस्पिटल तयार करायचे आहे. महायुतीचे सरकार आल्यावर विजेचे दर आपण कमी करणार आहोत. 15 वर्षात काँग्रेसने मज्जा केली, पैसे खाल्ले,  पुढील पाच वर्षे आता विकास करण्यात जाणार. सामान्य जनतेला आपण मंत्रालयात बसवले आहे. त्यामुळे आघाडीच्या पोटात दुखत आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

खंडसेंच्या नातीची छेड काढणारे विशिष्ट पक्षाचे; मुख्यमंत्र्यांची माहिती
खंडसेंच्या नातीची छेड काढणारे विशिष्ट पक्षाचे; मुख्यमंत्र्यांची माहिती.
मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी मोठी अपडेट आली समोर
मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी मोठी अपडेट आली समोर.
टावळखोरांनी काढली नातीची छेड; आजोबा एकनाथ खडसेंचे गंभीर आरोप
टावळखोरांनी काढली नातीची छेड; आजोबा एकनाथ खडसेंचे गंभीर आरोप.
मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड; महिला आयोगाने घेतली दखल
मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड; महिला आयोगाने घेतली दखल.
उद्या 100 टक्के अधिवेशनाआधी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार: करुणा शर्मा
उद्या 100 टक्के अधिवेशनाआधी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार: करुणा शर्मा.
3-3-2025 ला राजीनामा होणार, करुणा शर्मांची खळबळजनक पोस्ट
3-3-2025 ला राजीनामा होणार, करुणा शर्मांची खळबळजनक पोस्ट.
'तुम्हाला ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का?',दमानियांचा पंकजाताईंना सवाल
'तुम्हाला ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का?',दमानियांचा पंकजाताईंना सवाल.
'राज्यातून तुला उद्धवस्त करणार', शिवसेनेच्या नेत्याचं ठाकरेंना चॅलेंज
'राज्यातून तुला उद्धवस्त करणार', शिवसेनेच्या नेत्याचं ठाकरेंना चॅलेंज.
कराडच मास्टरमाईंड, अशी झाली सरपंचाची हत्या, आरोपपत्रातील AटूZ घटनाक्रम
कराडच मास्टरमाईंड, अशी झाली सरपंचाची हत्या, आरोपपत्रातील AटूZ घटनाक्रम.
सुप्रिया सुळेंचा थेट निशाणा, महाराष्ट्राची बदनामी या दोन लोकांमुळेच...
सुप्रिया सुळेंचा थेट निशाणा, महाराष्ट्राची बदनामी या दोन लोकांमुळेच....