सहसा मी प्रत्युत्तर देत नाही, पण.., बांगड्यांबाबतच्या विधानावर आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर!

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला बांगड्यांवरुन (Aaditya Thackerays answer to Devendra Fadnavis) केलेल्या वक्तव्याला पर्यावरण नेते आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.

सहसा मी प्रत्युत्तर देत नाही, पण.., बांगड्यांबाबतच्या विधानावर आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर!
Follow us
| Updated on: Feb 26, 2020 | 11:14 AM

मुंबई :  राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला बांगड्यांवरुन (Aaditya Thackerays answer to Devendra Fadnavis) केलेल्या वक्तव्याला पर्यावरण नेते आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी विनंती आदित्य ठाकरे (Aaditya Thackerays answer to Devendra Fadnavis) यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनादरम्यान आझाद मैदानातील भाषणावेळी शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही असं म्हटलं होतं. त्याला आता आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन माफी मागण्याची विनंती केली. “देवेंद्र फडणवीसजी, सहसा मी प्रत्युत्तर देत नाही. कृपया बांगड्यांबाबतच्या विधानाबाबत माफी मागा. सर्वात शक्तीशाली महिलांनी बांगड्या परिधान केल्या आहेत. राजकारण चालूच राहील, पण ही मानसिकता बदलायला हवी. किमान माजी मुख्यमंत्र्यांकडून तरी अशी अपेक्षा नाही” असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

माजी आमदार वारिस पठाण यांच्या 100 कोटी विरुद्ध 15 कोटीच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन फडणवीसांनी शिवसेनेला घेरलं होतं. आमचा हिंदू समाज सहिष्णू आहे, मात्र त्याला आमची दुर्बलता समजून असा कोणी लावारीस बोलत असेल, तर त्याला आम्ही सोडणार नाही.

“शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, खरं म्हटलं तर बांगड्या घातल्या हा शब्द आमच्या महिला कार्यकर्त्यांना आवडत नाही आणि म्हणून मी तो वापरणार नाही. मात्र, शिवसेना मूग गिळून बसली असेल, तरी आम्ही मूग गिळून बसणार नाही”, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं.

शिवाजी महाराजांचा अपमान झाला तरी चालेल मात्र आम्ही खुर्ची सोडणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे. पण भाजप शिवाजी महाराजांच्या वंशजांचा अपमान सहन करणार नाही. कोण आहे तो वारिस की लावारिस? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला होता.

भाजपने महाआघाडी सरकारविरोधात काल राज्यव्यापी एल्गार आंदोलन पुकारलं होतं. राज्यभरात विविध ठिकाणी 400 आंदोलनं झाल्याचा दावा भाजपने केला. मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis attacks on CM Uddhav Thackeray)  प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सर्व भाजप दिग्गजांनी हजेरी लावली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

संबंधित बातम्या 

वो मशहूर हुए, जो काबिल न थे! बांधावरच्या घोषणेचं काय झालं? सांगा उद्धवजी सांगा! : देवेंद्र फडणवीस 

ठाकरे सरकारचा विक्रम, शेतकरी कर्जमाफीला 400 महिने लागतील : देवेंद्र फडणवीस

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.