अब की बार भाजप तडीपार… उद्धव ठाकरे याचा जाहीरसभेत नारा

आमचं हिंदुत्व वेगळं आहे. तुमचं वेगळं आहे. आम्ही तुमचं हिंदुत्व मानायला तयार नाही. आमच्यासोबत समाजवादी आले, मुस्लिम येतात. आमचं हिंदुत्व चुल पेटवणारं आहे. तुम्ही दुसऱ्या पेटवणारे आहात अशीही टीका उध्दव ठाकरे यांनी यावेळी केली.

अब की बार भाजप तडीपार... उद्धव ठाकरे याचा जाहीरसभेत नारा
uddhav thackerayImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 03, 2024 | 7:17 PM

मुंबई | 3 मार्च 2024 : भाजपाने केवळ शहराची आणि स्थानकांची नावे बदलल्या पलिकडे काही केले नाही. त्यावेळी भाजपाने अच्छे दिन आएगे असा नारा होता. पण अच्छे दिन काही आले नाहीत. तो एक जुमला होता. आता भाजपा गॅरंटी देत आहे. हा एक जुमलाच आहे. आमच्या खासदारामुळे गेल्यावेळी तुम्ही अडीचशेच्या पार गेला होता हे लक्षात ठेवा. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा होता. आता दिल्लीचेही तख्त फोडावे लागेल, आता अब की तडीपार अशी घोषणा द्यावी लागेल. कसे चारशे पार जाता हे पाहातो अशी डरकाळी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी धारवी येथील सभेत फोडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी घोषणा अब की बार..त्यापाठोपाठ कार्यकर्त्यांनी तडीपार असा प्रतिसाद दिला.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ते पुढे म्हणाले की आठवर्षापूर्वी सव्वा लाख कोटीचं पॅकेज मोदींनी बिहारला जाहीर केलं होते. जाहीर सभेतून, त्यापैकी किती आले. आले असतील तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासोबत येतो असेही ते म्हणाले. आता मोदींचा फसवी फसवीचा खेळ सुरू आहे. आम्हीही दोनदा मोदींच्या भूलथापांना बळी पडलो. पदरात काय पडलं. धोंडे पडले तरी त्यात त्यांना शेंदूर फासून देव करता येतो. हे काय करणार. यांनी फक्त नावं बदललं. योजनांची नावे बदलली. काही काम केले नाही. आता जुमल्याचं नाव गॅरंटी ठेवली आहे. भ्रष्टाचार करा. भाजपमध्ये या तुमचे वाकडे होणार नाही. ही मोदी गॅरंटी असल्याची टीका ठाकरे यांनी केली.

गडकरी यांचे नाव पहिल्या यादीत…

भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली. मी त्यात जाणार नाही. मी त्यात जात नाही. त्यांच्या पक्षातही जाणार नाही असे सांगत ठाकरे पुढे म्हणाले की नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची नाव भाजपच्या यादीत. मोदी शाह हे नाव आम्हाला माहीत नव्हते. आम्हाला प्रमोद महाजन यांनी ओळख करून दिली. महाजन यांच्यासोबत नितीन गडकरी आले. गडकरी यांनी 55 उड्डाणपुलं बांधली. संघाचा निष्ठावंत माणूस आहे. पण त्यांचं नाव या पहिल्या यादीत नाही. मुंबईतील कृपाशंकर सिंह यांचं नाव यादीत आहे. पण गडकरींचं नाव नाही अशी टीका त्यांनी केली. दिल्लीचे तख्त फोडतो महाराष्ट्र माझा. पहिल्यांदा आपल्याला दिल्लीचे तख्त फोडावे लागेल. ‘अब की बार भाजप तडीपार’ ही घोषणा द्यावी लागेल. आता कसले 400 पार जाता ते बघतो. गेल्यावेळी महाराष्ट्राने निवडून दिले नसते तर तुम्ही अडीचशेच्या पार गेला नसता अशी जोरदार टीका ठाकरे यांनी यावेळी केली.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.