बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अब्दुल सत्तार म्हणाले, खैरे साहेबांचा आदेश जबाबदारीने पूर्ण करु
शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा आदेश जबाबदारीने पूर्ण करु, असं आश्वासन दिलं आहे.
औरंगाबाद : शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा आदेश जबाबदारीने पूर्ण करु, असं आश्वासन दिलं आहे. ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी बोलत होते. चंद्रकांत खैरे यांनी आगामी निवडणुकीत केवळ मराठवाड्यावरच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रावर भगवा झेंडा फडकावण्याचा संकल्प बोलून दाखवला. त्यावर बोलताना अब्दुल सत्तार यांनी हे आश्वासन दिलं (Abdul Sattar assure Chandrakant Khaire to spread Shivsena all over Maharashtra).
अब्दुल सत्तार म्हणाले, “खैरे साहेबांनी आम्हाला आदेश दिले आहेत की येणाऱ्या निवडणुकीत आपला भगवा हा मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात फडकवू. आम्ही खैरे साहेबांचा आदेश जबाबदारीने पूर्ण करु.”
‘संपूर्ण मराठवाडा शिवसेनामय, आता संपूर्ण महाराष्ट्रावर भगवा फडकावणार’
चंद्रकांत खैरे म्हणाले, “संभाजी नगरवर बाळासाहेब ठाकरे यांचं विशेष प्रेम होतं. संभाजी नगरला 1988 मध्ये बाळासाहेबांचा पदस्पर्श झाला, मग त्यापुढे संपूर्ण मराठवाड्यात शिवसेना पसरली. संपूर्ण मराठवाडा हा शिवसेनामय केला आहे, अशी आताची परिस्थिती आहे. संजय शिरसाठ असतील किंवा अब्दुल सत्तार यांनी सिल्लोढमध्ये भाजपला एन्ट्री सुद्धा दिलेली नाही.”
“शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद हा मराठवाड्यावर आहेच. कोरोना संपु द्या, मग बघा कसे दौरे करतो. शिवसेनेशिवाय किंवा महाआघाडीशिवाय मराठवाड्यात दुसरं कोणीही येऊ शकणार नाही. राष्ट्रवादीचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला राम राम ठोकला असला, तरी त्यांनी तसं काम करावं. स्मृती दिनानिमित्त येथे आल्यानंतर शक्ती मिळते. स्मृती दिन एकट्या शिवसेनेसाठी नाही, तर तमाम जनतेसाठी शक्ती स्थळ आहे. येथे ऊर्जा मिळते,” असंही चंद्रकांत खैरे म्हणाले.
‘बाळासाहेबांनी एका सामान्य रिक्षा चालकाला 15 वर्ष आमदार केलं’
आमदार संजय शिरसाठ म्हणाले, “आज बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येथे आलो. एक सामान्य रिक्षा चालकाला 15 वर्ष आमदार केलं आहे. असंख्य कार्यकर्ते बाळासाहेबांनी घडवलेले आहेत. आम्ही ताट मानेने जगायला शिकवणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी येथे आलो. भविष्यात शिवसेना कशी वाढेल यावर आमचा भर असेल.”
संबंधित बातम्या :
बिहारचा एक्झिट पोल एक्झॅक्ट ठरला की समजा दिल्ली खतरे में है; अब्दुल सत्तारांची टोलेबाजी
तुमच्यासारखे बेजबाबदार अधिकारी आम्हाला किराणा दुकानदार समजतात काय?; अब्दुल सत्तार भडकले
वैभव नाईकांकडून तीन दिवसात वचपा, कट्टर राणे समर्थकाचा शिवसेनाप्रवेश
संबंधित व्हिडीओ :
Abdul Sattar assure Chandrakant Khaire to spread Shivsena all over Maharashtra