TET Scam : अरे जाऊ द्या रे मंत्रिपद गिंत्रीपद, मी तीनदा मंत्री झालोय, कमकुवत लोकच त्यावर बोलतात; सत्तारांचा खैरेंवर हल्लाबोल

TET Scam : मला पृथ्वीराज बाबांबद्दल बोलायचं नाही. मी आधीच क्लिरिफिकेशन दिलं आहे. या घोटाळ्याबाबत कुणाला माहीत नव्हतं. व्हॉट्सअपवर यादी आली. कालच माझ्याकडे यादी आली होती. त्यावर मी तात्काळ उत्तर दिलं. कोणी तरी फेक न्यूज चालवत असल्याचं सांगितलं.

TET Scam : अरे जाऊ द्या रे मंत्रिपद गिंत्रीपद, मी तीनदा मंत्री झालोय, कमकुवत लोकच त्यावर बोलतात; सत्तारांचा खैरेंवर हल्लाबोल
अरे जाऊ द्या रे मंत्रिपद गिंत्रीपद, मी तीनदा मंत्री झालोय, कमकुवत लोकच त्यावर बोलतात; सत्तारांचा खैरेंवर हल्लाबोलImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 12:26 PM

मुंबई: मंत्रिपद हवे असेल तर अब्दुल सत्तार यांनी बडबड करू नये. शांत बसावे. नाही तर माझ्याकडे असलेली फाईल ओपन करेल, असा इशारा शिवसेनेचे (shivsena) नेते चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) यांनी शिंदे गटाचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार (abdul sattar) यांना दिला होता. त्यावर सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांच्याकडे जे मटेरियल आहे त्याला काही अर्थ आहे का? अरे जाऊ द्या रे ते मंत्रीपद गिंत्रीपद. मी तीनदा मंत्री राहिलो आहे. ते कमजोर, कमकुवत लोकच त्यावर बोलतात असतात. माझी सत्यता तपासण्यासाठी चंद्रकांत खैरे किंवा अजून कोणी हितचिंतक असतील तर त्यांनी खुशाल तपासावी. त्यांना काय पोकलेन, जेसीबी लागते का? त्यांनी पुरावे द्यावे. माझ्या परिवाराची चूक असेल किंवा आम्ही गुन्हा केला असेल तर मी गुन्हेगार आहे. मात्र, आमचं यात ज्यांनी नाव घुसवलं त्यांची चौकशी करण्यात झाली पाहिजे, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

अब्दुल सत्तार यांच्या मुलींचं टीईटी परीक्षा घोटाळ्यात नाव आल्याने खळबळ उडाली आहे. विरोधकांनीही त्यावरून सत्तार यांना घेरलं आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी तर सत्तार यांची फाईलच आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर सत्तार यांनी पत्रकार परिषद घेऊन खैरे यांच्या आरोपांना उत्तरे दिली. एक मिनिट ऐका. या देशात हजारो नेते आहेत. प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर देण्यास मी बांधिल नाही. मला कायद्याने उत्तर द्यायचं ते दिलं. कायद्याप्रमाणे त्यात कोणतीही चूक असेल तर मुख्यमंत्री चौकशीचे आदेश देतील. सचिव आणि शिक्षण अधिकारी यांच्याशिवाय कोण उत्तर देणार? असा सवाल सत्तार यांनी केला.

हे सुद्धा वाचा

अधिकची माहिती असेल तर कुणीही द्यावी

मी काही मुख्यमंत्री नाही. पंतप्रधान नाही. मी आमदार आहे. माझं नाव आलं. मी त्यावर उत्तर दिलं आहे. मला जे कळतं ते मी सांगितलं. त्याबदल्यात काही एक्स्ट्रा माहिती असेल तर द्यावी. खैरेंनी माहिती द्यावी. कोणत्याही साहेबांनी द्यावी. देशाची सर्वोच्च संस्था आहे ती चौकशी करत आहे. आमच्या मुली किंवा संस्थेने काही गैरफायदा घेतला असेल तर चौकशी केली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

ईडी तपासातून सर्व स्पष्ट होईल

माझा मुलगा टीईटी परीक्षेला बसलाच नाही. त्याचंही नाव आलं आहे. त्याचं नाव कसं आलं? हितचिंतक जर नाव टाकत असेल तर त्याला मी काय करू शकतो? ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यातून सर्व स्पष्ट होईल. नोकरी लावणं आणि पगार सुरू करणं यापलिकडे टीईटीचा अर्थ नाही, असंही ते म्हणाले.

सर्वात आधी मीच बोललो

मला पृथ्वीराज बाबांबद्दल बोलायचं नाही. मी आधीच क्लिरिफिकेशन दिलं आहे. या घोटाळ्याबाबत कुणाला माहीत नव्हतं. व्हॉट्सअपवर यादी आली. कालच माझ्याकडे यादी आली होती. त्यावर मी तात्काळ उत्तर दिलं. कोणी तरी फेक न्यूज चालवत असल्याचं सांगितलं. मीच स्वत:हून या प्रकरणाला वाचा फोडली आणि तुम्ही मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहात, असंही ते म्हणाले.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.