TET Scam: अब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत, शिक्षण संस्थेतील 12 शिक्षकांकडे टीईटीचे बोगस प्रमाणपत्र; अंबादास दानवेंचा दावा

टीईटी घोटाळा प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेतील आणखी बारा शिक्षकांकडे टीईटीचे बोगस प्रमाणपत्र असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.

TET Scam: अब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत, शिक्षण संस्थेतील 12 शिक्षकांकडे टीईटीचे बोगस प्रमाणपत्र; अंबादास दानवेंचा दावा
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 1:25 PM

औरंगाबाद :  टीईटी घोटाळा (TET Scam) प्रकरणात अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेतील आणखी बारा शिक्षकांकडे टीईटीचे बोगस प्रमाणपत्र असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. यापूर्वी टीईटी घोटाळा प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे देखील समोर आली होती. मात्र सत्तार यांनी सर्व आरोप फेटाळून लावत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. सत्तार यांच्या मुलींचीं नावे टीईटी घोटाळ्यात समोर आल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळणार का याबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येते होते. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात सत्तार यांना स्थान देण्यात आलं. आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलेल्या आरोपानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

नेमकं काय म्हटलंय  दानवेंनी?

दानवे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यांवर गंभीर आरोप केला आहे. नॅशनल एज्युकेशन सोसायटी ही सत्तारांची शिक्षण संस्था आहे.

या शिक्षण संस्थेतील आणखी बारा शिक्षकांकडे टीईटीचे बोगस प्रमाणपत्र असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे देखील आली होती.

हे सुद्धा वाचा

मात्र अब्दुल सत्तार यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबत बोलताना माझ्याकडे अब्दुल सत्तार यांच्या मुलींच्या पगाराची कागदपत्र असल्याचा दावा देखील अंबादास दानवे यांनी केला आहे.

चौकशीची मागणी

अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेतील आणखी बारा शिक्षकांकडे टीईटीचे बोगस प्रमाणपत्र आहे. असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

सोबतच सत्तार यांची या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे असं देखील दानवे यांनी म्हटलं आहे. तसेच सत्तार यांच्या मुलीच्या पगाराची कागदपत्र देखील आपल्याकडे असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.