शिंदेगटातील 22 आमदार नाराज म्हणणं म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने!, अब्दुल सत्तार यांची खोचक टीका

आजच्या सामनाच्या रोखठोक या सदरातून शिंदेगटातील आमदार नाराज असल्याचं म्हणण्यात आलं आहे.त्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदेगटातील 22 आमदार नाराज म्हणणं म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने!, अब्दुल सत्तार यांची खोचक टीका
Follow us
| Updated on: Oct 23, 2022 | 1:16 PM

औरंगाबाद : आजच्या सामनाच्या रोखठोक या सदरातून शिंदेगटातील आमदार नाराज असल्याचं म्हणण्यात आलं आहे. शिंदे गटातील 22 आमदार नाराज आहेत, असं आजच्या सामनात म्हणण्यात आलं आहे. त्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाष्य केलंय. शिंदे गटातील 22 आमदार नाराज म्हणणं म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत, असं सत्तार (Abdul Sattar) म्हणालेत. तसंच उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) औरंगाबाद दौऱ्यावरही टीका केली आहे.

22 आमदार नाराज हे मुंगेरीलाल के सपने आहेत. ते कधी खरे होत नाहीत. हे लोक गणपतीला आठवत बसले आहेत. कधीतरी हे 22 आमदार नाराज होतील. यांच्या पोटात जो पोटशूळ उठलेला आहे. तो कमी होईल, असं सत्तार म्हणालेत. त्यांच्याकडे जे उरलेले 15 आमदार आहेत. ते सांभाळले तरी फार झालं. त्यांनी आपले आमदार सांभाळावेत, असं सत्तार यांनी म्हटलं आहे.

सत्तार यांची उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया

निश्चितपणे उद्धव ठाकरे यांनी दौरा केला पाहिजे. शेतकऱ्यांना त्यांच्या शिवसेनेकडून मदत पण द्यायला हवी. परंतु जर केवळ राजकारण करण्यासाठी येत असतील तर याला जनता माफ करणार नाही. आगामी जिल्हा परिषद महापालिकेत शेतकरी यांना उत्तर देतील, असं सत्तार म्हणालेत.

उद्धव ठाकरेंनी निश्चितपणे रस्त्यावर उतरले पाहिजे. कारण त्यांच्यावर आता रस्त्यावर उतरण्याची पाळी आलीय. पूर्वी ज्यावेळी रस्त्यावर यायला पाहिजे होते. शेतकरी गोरगरिबांना मदत करायला हवी होती ती न केल्याने ही वेळ आली. शिवसेनेकडील 55 आमदारांची फौज होती. त्यापैकी 40 आमदार शिंदेगटात आहेत. उद्धव ठाकरेंकडे फक्त 15 आमदार राहिलेत. हे लोक आपल्याला सोडून का गेले याचं त्यांनी चिंतन करायला हवं, असं अब्दुल सत्तार म्हणालेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.