ममता बॅनर्जींच्या भाच्याची मोदींना मानहानीची नोटीस
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि तृणमूल काँग्रेसचे विद्यमान खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बर या ठिकाणी आयोजित केलेल्या एका सभेत मोदींनी अभिषेक यांच्याबद्दल बोलताना अपमानास्पद वक्तव्य केलं होते. त्याविरोधात अभिषेक यांनी नरेंद्र मोदींना मानहानीची नोटीस पाठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची […]
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि तृणमूल काँग्रेसचे विद्यमान खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बर या ठिकाणी आयोजित केलेल्या एका सभेत मोदींनी अभिषेक यांच्याबद्दल बोलताना अपमानास्पद वक्तव्य केलं होते. त्याविरोधात अभिषेक यांनी नरेंद्र मोदींना मानहानीची नोटीस पाठवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बर या ठिकाणी 15 मे ला प्रचारसभा आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी भाषणामध्ये माझ्याबद्दल बोलताना काही अपमानास्पद वक्तव्य केलं. त्याशिवाय त्यांनी भाषणादरम्यान ‘दीदी’ आणि ‘भाचा’ या दोन शब्दांचाही प्रयोग केला होता. तसेच भाषणादरम्यान त्यांनी माझा उल्लेख ‘गुंड’ म्हणून केला होता. त्याशिवाय नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या निकालानंतर माझ्या कार्यालयाला टाळे लावू अशी धमकीही दिली होती. पंतप्रधानांनी ‘गुंड’ या शब्दाचा वापर केल्याने माझा अपमान झाला आहे. यामुळे मी पंतप्रधानांना मानहानीची नोटीस पाठवत आहे.
TMC leader & nephew of West Bengal CM Mamata Banerjee, Abhishek Banerjee through his lawyer sends a defamation notice to Prime Minister Narendra Modi for alleged derogatory remarks made against him in a public rally on 15 May, held in Diamond Harbour in West Bengal. (file pic) pic.twitter.com/3kYEcyiQBu
— ANI (@ANI) May 18, 2019
यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. दोन्ही नेत्यांच्या पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहे. अनेकदा कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचाराचेही प्रकार समोर आलेत. त्यातच कोलकात्यात भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या प्रचारादम्यान रोड शो वेळी अनेक ठिकाणी जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना घडल्या. या कारणामुळे मतदानाच्या दोन दिवस आधीच म्हणजे 17 मे रोजी निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील प्रचार थांबवण्याचे आदेश दिले होते.
अभिषेक बॅनर्जी तृणमुल काँग्रेसचे खासदार असून ते पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जातात. अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बरमधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. आज या ठिकाणी मतदान पार पडत आहे. त्यांच्यासमोर भाजपाच्या नीलांजन रॉय यांचे आव्हान आहे. पश्चिम बंगालच्या डम डम, बारासात, बासीरहाट, जयनगर, माथुरपूर, जाधवपूर, डायमंड हार्बर, दक्षिण आणि उत्तर कोलकाता या नऊ जागांवर आज मतदान पार पडणार आहे.