शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी मान्य करुन मार्ग निघाला असता : एकनाथ खडसे
"शिवसेनेची एक-दोन वर्षे मुख्यमंत्रिपदाची मागणी मान्यही केली असती, तर चर्चेतून मार्ग निघू शकला असता," असेही खडसे (Eknath Khadse on Chief Minister) म्हणाले.
मुंबई : “शिवसेना आणि भाजपमध्ये समन्वय होऊन चर्चा झाली असती. जर दोन पावलं मागे घेतली असती तर महायुतीचाच मुख्यमंत्री झाला असता,” असे खळबळजनक वक्तव्य भाजप नेते एकनाथ खडसे यांनी (Eknath Khadse on Chief Minister) केले. “शिवसेनेची एक-दोन वर्षे मुख्यमंत्रिपदाची मागणी मान्यही केली असती, तर चर्चेतून मार्ग निघू शकला असता,” असेही खडसे (Eknath Khadse on Chief Minister) म्हणाले.
“मला वाटतं जनतेने महायुतीला मतदान केलं होतं. शिवसेना आणि भाजपमध्ये समन्वय होऊन चर्चा झाली असती. जर दोन पावलं मागे घेतली असती, तर मुख्यमंत्री महायुतीचाच झाला असता. शिवसेनेची एक दोन वर्षे मुख्यमंत्रिपदाची मागणी मान्यही केली असती, तरी चर्चेतून मार्ग निघू शकला असता. माझा रोख माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जो नेतृत्व करतो आहे, त्यांच्याकडे आहे.” असेही ते (Eknath Khadse on Chief Minister) म्हणाले.
एकनाथ खडसेंनी आज (4 डिसेंबर) पंकजा मुंडे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. या भेटीनंतर एकनाथ खडसेंनी माध्यमांशी संवाद साधला.
खडसे म्हणाले, “पंकजाताईंची भेट ही कौटुंबिक भेट होती. गोपीनाथ मुंडे हे माझे चांगले मित्र होते. पंकजाताई आणि रोहिणीताईंचा पराभव झाला, त्या कारणांवर चर्चा झाली. ज्यांनी पक्षाविरोधी कामगिरी केली, त्यांची नावं वरिष्ठांकडे पाठवली आहेत, आता कारवाईची प्रतीक्षा आहे”
“तसेच खालच्या माणसांना बोलण्यात अर्थ नाही. ज्यांनी हे निर्णय घेतले, त्यांनाच दोष द्यावा लागेल. पक्ष यातील दोषी नसतो. पक्षाचं नेतृत्व करणारे जसे यशाचे भागीदार होतात, तस अपयशाचेही भागीदारही व्हावं,” असेही खडसे (Eknath Khadse on Chief Minister) म्हणाले.
“यश मिळालं तर माझ्यामुळे आणि अपयश मिळालं तर दुसऱ्यामुळे हे माझ्या 40 वर्षांच्या राजकीय जीवनात आम्ही कधी शिकलो नाही. आमच्यावेळी देखील अपयश आलं, त्याला आम्हीही तोंड दिलं आहे. त्यावेळी आम्ही ते अपयश मान्य केलं. त्यावेळी आम्ही पराभव मान्य करत अपयश स्विकारलं. तशी पराभवाची जबाबदारी घेतली गेली पाहिजे. ती जबाबदारी पक्ष म्हणून नाही तर ज्याने नेतृत्त्व केलं त्यांनी स्विकारलं पाहिजे. आमच्या भागात आमचे आमदार पाडले असतील आणि तेथील जबाबदारी खडसेंकडे दिलेली असेल, तर त्याला खडसे जबाबदार आहेत.” अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
“सरकार स्थापनेला आता 8 दिवसच झाले आहेत. त्यामुळे आता सरकारचं किंवा विरोधी पक्षाचं मुल्यमापन करता येणार नाही. त्यांना कामाची संधी दिली गेली पाहिजे. पुढच्या काळात कुणाचं काम चांगलं आहे, कुणाचं वाईट आहे याचं मुल्यमापन करता येईल.” असेही ते (Eknath Khadse on Chief Minister) म्हणाले.
“आज विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. नाराजांची मोट बांधण्याची आवश्यकता नाही. पक्षातील जे नेते अस्वस्थ आणि नाराज आहेत ते आपोआपच एकत्र होतात.” असेही ते म्हणाले.