Eknath Shinde : खाते वाटपाला ‘खो’, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आता खातेवाटपाला मुहूर्त कधी..?
आगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार यावरुन तर्क-वितर्क काढले जात होते. अखेर विरोधकांकडून होत असलेले आरोप पाहता शिंदे सरकारने पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळाचा विस्तार तर केला पण खातेवाटप अद्यापही बाकी आहे. त्यामुळे विस्तारानंतर दोन दिवसांमध्ये खातेवाटप आणि पालंकमंत्री पदही दिले जाणार असल्याची चर्चा होती.
मुंबई : शिंदे सरकारचा (Cabinet Expansion) मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर गुरुवारी रात्री किंवा शुक्रवारी (State Government) खातेवाटपही होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता खातेवाटपाचा कार्यक्रम हा पुढे ढकलण्यात आला आहे. कारण (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील वाईला जाणार आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे गुरुवारी दिवसभर सुरु असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून आता कोणते खाते कुणाकडे हे एवढ्यातच स्पष्ट होणार नाही. मात्र, समाजमाध्यमावर व्हायरल होत असलेल्या यांद्यामध्ये काही तथ्य नसल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता 15 ऑगस्ट पूर्वी खाते वाटप होणार की नंतर हे पहावे लागणार आहे.
अन् चर्चांना लागला ‘ब्रेक’
आगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार यावरुन तर्क-वितर्क काढले जात होते. अखेर विरोधकांकडून होत असलेले आरोप पाहता शिंदे सरकारने पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळाचा विस्तार तर केला पण खातेवाटप अद्यापही बाकी आहे. त्यामुळे विस्तारानंतर दोन दिवसांमध्ये खातेवाटप आणि पालंकमंत्री पदही दिले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, सरकारने घोषणा करण्यापूर्वीच माध्यमांनी हे सर्व केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर जे सध्या सोशल मिडियावर सुरु आहे तशा स्वरुपाचे खाते वाटप नसणार असेही ते म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री दौऱ्यावर अन् मंत्री मतदारसंघात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील वाईकडे मार्गस्थ झाले आहेत तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वैयक्तिक कामासाठी नागपूरकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे गुरुवारी तर खातेवाटप नाही हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आता मुंबईतून मंत्रीही आपआपल्या मतदार संघात परतू लागल्याचे चित्र आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण आता खातेवाटप झाल्यावरच प्रत्यक्ष कामाकाजास सुरवात होणार आहे. त्यामुळे हा टप्पा देखील महत्वाचा आहे.
खातेवाटपाचे अधिकार मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना
मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिंदे गटातील कोणीही नाराज नाही. शिवाय तसे काही कारणही नाही. सर्वांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा शब्द प्रमाण असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. इतरांना पुढच्या टप्प्यात संधी मिळेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला तर खाते वाटपाचा अधिकार हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच असल्याचे सांगितले होते. मंत्रिमंडळाचा विस्तार होताच आता कोणते खाते मिळणार यावरुन कार्यकर्ते आणि मंत्री यांची देखील उत्सुकता शिघेला पोहचली आहे. त्यामुळे 15 ऑगस्टपूर्वी की नंतर हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.