Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंडातात्यांच्या अटकेनंतर तुषार भोसले खवळले, म्हणाले, ‘उद्धव ठाकरे- अजितदादा आता तयार रहा…’

बंडातात्यांना अटक करायला लाज कशी वाटली नाही. आता उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी परिणाम भोगायला तयार रहा, असा इशारा आचार्य भोसले यांनी सरकारला दिला आहे. (Acharya Tushar Bhosale Criticized Thackeay Government Over Arrest bandatatya Karadkar)

बंडातात्यांच्या अटकेनंतर तुषार भोसले खवळले, म्हणाले, 'उद्धव ठाकरे- अजितदादा आता तयार रहा...'
अजित पवार, आचार्य तुषार भोसले आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 8:58 AM

औरंगाबाद : राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. बंडातात्यांच्या अटकेनंतर भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) खवळले आहेत. मुघलांपेक्षा ठाकरे सरकार अत्याचारी आहे. बंडातात्यांना अटक करायला लाज कशी वाटली नाही. आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी परिणाम भोगायला तयार रहावं, असा दम आचार्य भोसले यांनी भरला आहे. (Acharya Tushar Bhosale Criticized Thackeay Government Over Arrest bandatatya Karadkar)

काय म्हणाले आचार्य तुषार भोसले?

औरंगजेबापेक्षाही राज्यातलं सरकार अत्याचारी आहे. मुघलांनी सुद्धा वारकऱ्यांचे इतके हाल केले नव्हते. भागवत धर्माची भगवी पताका घेऊन जाणाऱ्या बंडातात्या आणि वारकऱ्यांना अटक करणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?, असा सवाल तुषार भोसले यांनी विचारला.

उद्धव ठाकरे- अजितदादा आता परिणाम भोगायला तयार रहा

तुषार भोसले यांनी शिवसेनेसा देखील लक्ष्य केलं. बंडातात्यांच्या अटकेनंतर शिवसेनेला आता भगवा झेंडा हातात घेण्याचा अधिकार नाही, असं ते म्हणाले. तर सरकारला इशारा देताना उद्धवजी आणि अजित पवार आता परिणाम भोगायला तयार रहा, असं ते म्हणाले.

बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात, आमदार महेश लांडगे भेटीला

शासनाचा आदेश झुगारुन पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर बंडातात्या कराडकर यांच्या समर्थकांनी संकल्प गार्डन बाहेर जमायला सुरुवात झाली. तसेच स्थानिक आमदार महेश लांडगे हेदेखील त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे. सध्या मंगल कार्यालयाबाहेर काही समर्थक ठिय्या देऊन बसले आहेत. यावर आता पोलीस प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारने आषाढी वारी सोहळ्यावर निर्बंध घातले आहेत. केवळ मानाच्या पालख्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. वाखरीपासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत प्रतिकात्मक पायी वारी काढली जाणार आहे. मात्र, सामान्य वारकऱ्यांना मात्र पायी वारीस मज्जाव करण्यात आला आहे.

कोण आहेत तुषार भोसले?

तुषार भोसले हे भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत. आध्यात्मिक क्षेत्रातील ते आचार्य आहेत. त्यांना देण्यात आलेल्या आचार्य पदवीबाबतही वाद झाला होता. तसेच तुषार भोसले यांचं खरं नाव तुषार शालीग्राम पितांबर असल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ते बहुजन समाजाचे नसून ब्राह्मण असल्याच्या चर्चाही मधल्या काळात रंगल्या होत्या. त्यांनी वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज यांच्याकडे वेदांचे शिक्षण घेतले आहे. ते जगन्नाथ महाराजांचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जातात. त्यांनी पुढील शिक्षण मुंबईतील भारतीय विद्याभवनमधून घेतले आहे. वयाच्या 17 व्या वर्षी अखंड 365 दिवस प्रवचन देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

भारतीय विद्याभवनने त्यांना 2012 रोजी अद्वैत वेदांतात शास्त्री ही पदवी दिली. ते कीर्तनकार, प्रवचनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. तसेच प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणूनही त्यांची प्रतिमा तयार होत आहे. ते सातत्याने राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात. (ajit pawar taunt tushar bhosle, know about acharya)

(Acharya Tushar Bhosale Criticized Thackeay Government Over Arrest bandatatya Karadkar)

हे ही वाचा :

VIDEO: कोण आहेत ते तुषार भोसले? अजित पवारांनी जेव्हा भाजपच्या वारकरी नेत्याला जागा दाखवली!

राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.