पत्नी हेमा मालिनीसाठी धर्मेंद्रही प्रचाराच्या मैदानात?
लखनौ : देशात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. प्रत्येक पक्षातर्फे मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन, सभा आणि रोड शो आयोजित करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज मंडळीही निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी उत्तर प्रदेशच्या मथुरा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभ्या आहेत. हेमा मालिनी यांचा मथुरा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु आहे. मात्र […]
लखनौ : देशात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. प्रत्येक पक्षातर्फे मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन, सभा आणि रोड शो आयोजित करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज मंडळीही निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी उत्तर प्रदेशच्या मथुरा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभ्या आहेत. हेमा मालिनी यांचा मथुरा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु आहे. मात्र आता या प्रचारामध्ये हेमा मालिनी यांचे पती ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्रही प्रचारासाठी उतरणार आहेत. रविवारी (14 एप्रिल) होणार प्रचारात धर्मेंद्र उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धर्मेंद्र आपल्या पत्नीसाठी प्रचारात सहभागी होणार असल्याने बॉलिवूड आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. उत्तर प्रदेशच्या काही भागात जाट समाज मोठ्या प्रमाणात राहतो. येथील मतांसाठी भाजपाकडून हेमा मािलनी यांच्या मतदारसंघात धर्मेंद्र यांना बोलवण्यात आले असल्याचे म्हटलं जात आहे.
रविवारी (14 एप्रिल) धर्मेंद्र मथुरामध्ये प्रचार रॅलीत दिसणार असल्याने म्हटलं जात आहे. धर्मेंद्र उत्तर प्रदेशमधील तीन विधानसभा क्षेत्रात प्रचार करताना दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच येथील जाट समाजाची लोकसंख्या असलेल्या भागात भाषणही करणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र भाजपातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या काही सभांमध्ये भाषण करणार असल्याची चर्चाही सध्या सुरु आहे. पहिली सभा गोवर्धन विभागातील खूटैल पट्टच्या जाट बहुल विभागात होणार आहे. दुसरी सभा बलदेव विधानसभा मतदारसंघात होणार आहे. तसेच येथे रोड शोही असणार आहे. याशिवाय मांट येथे तीसरी सभा होणार आहे.