अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा भाजपमध्ये प्रवेश
मुंबई : मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरची सुरुवात करणारी बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरने आज भाजपमध्ये प्रवेश कोला. षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या भाजपच्या वाहतूक विभागाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ईशा कोप्पीकरने भाजपमध्ये प्रवेश करत राजकारणात पदार्पण केले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बॉलिवूडमधील कलाकारांना पक्षात सामील करत प्रचारात स्टार कॅम्पेनर म्हणून वापरण्यावर भाजपचा भर असल्याचं दिसून […]
मुंबई : मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरची सुरुवात करणारी बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरने आज भाजपमध्ये प्रवेश कोला. षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या भाजपच्या वाहतूक विभागाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ईशा कोप्पीकरने भाजपमध्ये प्रवेश करत राजकारणात पदार्पण केले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बॉलिवूडमधील कलाकारांना पक्षात सामील करत प्रचारात स्टार कॅम्पेनर म्हणून वापरण्यावर भाजपचा भर असल्याचं दिसून येत आहे.
Mumbai: Actor Isha Koppikar joins Bharatiya Janata Party (BJP) in the presence of Union Transport Minister Nitin Gadkari. #Maharashtra pic.twitter.com/XLETYOcppT
— ANI (@ANI) January 27, 2019
ईशा कोप्पीकरने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ईशा कोप्पीकरचा स्वत:चा असा वेगळा चाहतावर्ग आहे. याचा फायदा भाजपाला आगामी निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.
ईशाने आतापर्यंत अनेक हिंदी, मराठी, तामिळ, तेलुगू, कन्नड भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘रब ने बना दी जोडी’, ‘एक विवाह ऐसा भी’, ‘राईट या राँग’, ‘मैंने प्यार क्यों किया’, ‘डरना जरुरी है’, ‘क्या कूल है हम’, ‘हम तुम’ यासारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये ईशाने अभिनय केला आहे.
ईशाने गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘एफयू : फ्रेंडशीप अनलिमिटेड’ या मराठी चित्रपटातही महत्त्वाची भूमिका निभावली होती. तर 2013 साली प्रदर्शित झालेल्या ‘मात’ या चित्रपटाद्वारे ईशाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.