Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेत प्रवेश करताच उर्मिलाचा मराठी बाणा, कंगनाला सॉलिड टोला

कंगनाला अजिबात उत्तर देणार नाही. कंगनावर गरजेपेक्षा जास्त बोललं गेलं आहे. आता बोलायची गरज नाही, असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

शिवसेनेत प्रवेश करताच उर्मिलाचा मराठी बाणा, कंगनाला सॉलिड टोला
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 8:43 PM

मुंबईअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मंगळवारी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रश्मी ठाकरेंच्या हस्ते मनगटावर शिवबंधन बांधलं. मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. आज अखेर त्यांनी अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला. मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्या कंगनाच्या टीकेला आता यापुढे शिवसेनेतर्फे उत्तर देतील, अशी चर्चा होती. मात्र ‘मी अजिबात कंगनाला उत्तर देणार नाही. याअगोदरच तिच्यावर गरजेपेक्षा जास्त बोललं गेलंय’, असं पक्षप्रवेशानंतर त्यांनी म्हटलंय. (Actress Urmila Matondkar Statement On kangana Ranaut After join Shivsena)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसंच सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांना शिवसेनेत सामिल करुन घेतलं. यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर आपली मतं मांडली. याच पत्रकार परिषदेत त्यांना कंगनाबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी कंगनाला टोला लगावत तिने केलेल्या टीकेला अजिबात उत्तर देणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

“कंगनाला अजिबात उत्तर देणार नाही. कंगनावर गरजेपेक्षा जास्त बोललं गेलं आहे. आता बोलायची गरज नाही. टीका करायला लोकशाही आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी कंगनाला उत्तर देण्यासाठी मुलाखत दिली नव्हती. त्या मुलाखतीचा तो एक भाग होता. बोलण्याच्या ओघात तसंच प्रश्नही कंगनाबाबत विचारला गेला. त्यामुळे तिच्यावर जास्त बोललं गेलं”, असं उर्मिला म्हणाल्या.

शिवसेनेने तुमच्यावर कोणती नवी जबाबदारी टाकली आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या, “मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणूनच काम करायला आलेली आहे. माझ्या इथून पुढच्या राजकीय कारकीर्दीत मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करीन, लोकनेता होण्याचा प्रयत्न करीन”.

“शिवसेनेची महिला आघाडी भक्कम आहे. मला शिवसेनेचा भाग झाल्याचा आनंद आहे. मुंबईत महाराष्ट्र आणि जगभरातून असंख्य मुली येतात. त्यांचे आई-वडील अत्यंत आत्मविश्वासाने पाठवतात की, आमच्या मुली मुंबईत सुखरुप आहेत. मला अत्यंत आनंद आणि अभिमान हे की त्या मुंबई शहराचा मी भाग आहे. महिला सुरक्षेबाबतचे अनेक समस्या आहेत. त्यासाठी मला काम करायचे आहे”, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

“मला विधानपरिदेचे सदस्यत्व अजून दिलेलं नाही. ते देतील तेव्हा देतील. शिवसेनेने माझं नाव सूचवलं आहे. मला तुम्हाला नम्रपणे सांगायला आवडेल की, मला पक्षप्रवेशाची कोणतीही सक्ती नव्हती. मला काम करायची इच्छा असल्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे, असंही सांगायला उर्मिला विसरल्या नाहीत.

(Actress Urmila Matondkar Statement On kangana Ranaut After join Shivsena)

संबंधित बातम्या

Urmila Matondkar LIVE | मी जन्माने हिंदू, माझा धर्म हिंदू : उर्मिला मातोंडकर

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.