Urmila Matondkar | मी जन्माने हिंदू, माझा धर्म हिंदू : उर्मिला मातोंडकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर दुपारी 1 वाजताच्या सुमारास उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या हस्ते तिने हाती शिवबंधन बांधून घेतलं.

Urmila Matondkar | मी जन्माने हिंदू, माझा धर्म हिंदू : उर्मिला मातोंडकर
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 5:04 PM

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने आज शिवसेनेत प्रवेश केला (Actress Urmila Matondkar Will Join ShivSena). मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर दुपारी 1 वाजताच्या सुमारास उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या हस्ते तिने हाती शिवबंधन बांधून घेतलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. हातात भगवा घेतल्यानंतर तिने बाळासाहेबांच्या प्रतिमेला वंदन केलं.

त्यानंतर दुपारी 4 वाजता उर्मिला मातोंडकरने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उर्मिला मोठे गौप्यस्फोट करण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती (Actress Urmila Matondkar Will Join ShivSena) या पत्रकार परिषदेत उर्मिलाने शिवसेना, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या महिला आघाडीचं तोंडभरुन कौतुक केलं. तसेच, भाजप आणि अभिनेत्री कंगना रनौतवर घणाघाती टीकाही केली.

LIVE

[svt-event title=”माझ्यासोबत काँग्रेसमध्ये महिला म्हणून गैरव्यवहार झाल्याचं कधीच बोलले नाही : उर्मिला मातोंडकर” date=”01/12/2020,4:50PM” class=”svt-cd-green” ] माझ्यासोबत काँग्रेसमध्ये महिला म्हणून गैरव्यवहार झाल्याचं कधीच बोलले नाही, हे (संजय राऊत) खासदार असले तर ती (कंगना) पद्मश्री आहे, मला इतरांच्या भाषेबद्दल विचारु नका : उर्मिला मातोंडकर [/svt-event]

[svt-event title=”बॉलिवूडला महाराष्ट्रापासून वेगळं करणं कठीण : उर्मिला मातोंडकर ” date=”01/12/2020,4:49PM” class=”svt-cd-green” ] बॉलिवूड हा एक शब्द, मुंबईशी बॉलिवूडशी अनोखं नातं, महाराष्ट्रापासून त्याला वेगळं करणं कठीण, उत्तर प्रदेशातील चित्रपट सृष्टीही चांगलं काम करेल : उर्मिला मातोंडकर [/svt-event]

[svt-event title=” पक्षप्रवेशानंतर मी बाळासाहेबांच्या प्रतिमेसमोर नमन केलं : उर्मिला मातोंडकर ” date=”01/12/2020,4:48PM” class=”svt-cd-green” ] मी मुंबईत वाढले, माझ्यासाठी नेहमीच शिवसेना चांगली, बाळासाहेबांचं स्थान हिरावू शकत नाही, पक्षप्रवेशानंतर मी त्यांच्या प्रतिमेसमोर नमन केलं, त्यांच्या निधनानंतर दोन तीन दिवस दुखवटा : उर्मिला मातोंडकर [/svt-event]

[svt-event title=”राजकारण काय असतं ते महाराष्ट्रातील जनतेला समजते : उर्मिला मातोंडकर ” date=”01/12/2020,4:48PM” class=”svt-cd-green” ] देशाच्या राजकारणात विषारी वातावरण निर्माण झालंय, विषारी वातावरण घालवण्यासाठी काम केलं पाहिजे, महाराष्ट्राची जनता सर्व पाहतेय, राजकारण काय असतं ते महाराष्ट्रातील जनतेला समजते : उर्मिला मातोंडकर [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसने मला विधानपरिषदेची ऑफर दिली होती : उर्मिला मातोंडकर” date=”01/12/2020,4:47PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसने मला विधानपरिषदेची ऑफर दिली होती, हे मी कधीच सांगितलं नसतं, पदाची लालसा नव्हती, इतर कारणांमुळे मी ऑफर स्वीकारणे प्रशस्त समजले नाही : उर्मिला मातोंडकर [/svt-event]

[svt-event title=”अंतर्गत राजकारणात मला आजही रस नाही : उर्मिला मातोंडकर” date=”01/12/2020,4:45PM” class=”svt-cd-green” ] अंतर्गत राजकारण प्रत्येक पक्षात असतात, मी त्यावेळी नवखी होते, त्यामुळे मी हाताळण्यास असमर्थ ठरले असेन, मला त्यात आजही रस नाही : उर्मिला मातोंडकर [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसविषयी कोणताही वाईट हेतू नाही : उर्मिला मातोंडकर” date=”01/12/2020,4:45PM” class=”svt-cd-green” ] सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविषयी आदर, बाळासाहेब थोरात हे उत्तम नेते, काँग्रेसविषयी कोणताही वाईट हेतू नाही : उर्मिला मातोंडकर [/svt-event]

[svt-event date=”01/12/2020,4:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरेंचा विचार आवडला : उर्मिला मातोंडकर” date=”01/12/2020,4:44PM” class=”svt-cd-green” ] उद्धवजी घरातील सदस्याप्रमाणे बातचित करतात, उद्धव ठाकरे यांनी फोन केला, विधानपरिषदेचा सामाजिक आणि सांस्कृतिक दर्जा समृद्ध आहे, तो वारसा वाढवण्यासाठी आपण यावं, हा उद्धव ठाकरेंचा विचार आवडला : उर्मिला मातोंडकर [/svt-event]

[svt-event title=”योगी आदित्यनाथ यांचं स्वागत- उर्मिला मातोंडकर” date=”01/12/2020,4:42PM” class=”svt-cd-green” ] योगी आदित्यनाथांचं स्वागत, त्यांना जय महाराष्ट्र सांगू शकता – उर्मिला मातोंडकर [/svt-event]

[svt-event title=”मी जन्माने आणि कर्माने हिंदू : उर्मिला मातोंडकर” date=”01/12/2020,4:41PM” class=”svt-cd-green” ] सेक्युलर याचा अर्थ धर्मांचा तिरस्कार करणे नाही, मी जन्माने आणि कर्माने हिंदू, हिंदू धर्माचा अभ्यास, नवव्या वर्षापासून योग करते, देव मंदिराच्या गाभाऱ्यात असतो, तसा धर्म हा मनातील आस्थेचा विषय : उर्मिला मातोंडकर [/svt-event]

[svt-event title=”महिला सुरक्षा आणि तत्सम विषयांवर काम करायला आवडेल : उर्मिला मातोंडकर” date=”01/12/2020,4:39PM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेची महिला आघाडी भक्कम, मला त्याचा भाग होण्यास मिळाले, तर आनंदच, महिला सुरक्षा आणि तत्सम विषयांवर काम करायला आवडेल : उर्मिला मातोंडकर [/svt-event]

[svt-event title=”मी शिवसैनिक म्हणून आलेली आहे, शिवसैनिक म्हणूनच काम करेन – उर्मिला मातोंडकर” date=”01/12/2020,4:35PM” class=”svt-cd-green” ] मी शिवसैनिक म्हणून आलेली आहे, शिवसैनिक म्हणूनच काम करेन, राज्यपालांकडे माझं नाव पाठवलं आहे, माझ्यावर पक्षप्रवेशाची कोणतीही सक्ती नव्हती, मुळात मला काम करण्याची इच्छा होती, त्यामुळेच मी शिवसेनेत प्रवेश – उर्मिला मातोंडकर [/svt-event]

[svt-event title=”मी मराठी आहे, पाऊल पुढेच टाकणार” date=”01/12/2020,4:30PM” class=”svt-cd-green” ] माझे ट्रोलर्स हीन पातळीवर वैयक्तिक टीका करतात, मी मराठी आहे, पाऊल पुढेच टाकणार, त्यांनी त्यांचं काम करावं, मी माझं करेन : उर्मिला मातोंडकर [/svt-event]

[svt-event date=”01/12/2020,4:29PM” class=”svt-cd-green” ] कंगनाला उत्तर देणार नाही, मी तिची फॅन नाही, तिच्यावर गरजेपेक्षा जास्त बोललं गेलं, मुलाखतीत ओघामध्ये प्रश्न विचारले, त्यामुळे बोलले, पण गरजेपेक्षा जास्त महत्त्व नको : उर्मिला मातोंडकर [/svt-event]

[svt-event date=”01/12/2020,4:29PM” class=”svt-cd-green” ] कोरोना, नैसर्गिक आपत्ती यामध्ये महाराष्ट्र सरकारनं चांगलं काम केले आहे. काँग्रेसला 14 महिन्यांपूर्वी सोडलं आहे. विधान परिषदेसाठी नाव सूचवलेलं आहे. : उर्मिला मातोंडकर [/svt-event]

[svt-event date=”01/12/2020,4:28PM” class=”svt-cd-green” ] मी शिवसैनिक म्हणून आलेली आहे, शिवसैनिक म्हणूनच काम करेन, राज्यपालांकडे माझं नाव पाठवलं आहे, माझ्यावर पक्षप्रवेशाची कोणतीही सक्ती नव्हती, मुळात मला काम करण्याची इच्छा होती, त्यामुळेच मी शिवसेनेत प्रवेश – उर्मिला मातोंडकर [/svt-event]

[svt-event date=”01/12/2020,4:28PM” class=”svt-cd-green” ] मी काँग्रेस पक्ष सोडून 14 महिने झालेत, महाविकास आघाडी सरकारला केवळ 3 महिने मिळाले, त्यानंतर कोरोना आला, या काळात सरकारने उत्तम काम केलं – उर्मिला मातोंडकर [/svt-event]

[svt-event date=”01/12/2020,4:28PM” class=”svt-cd-green” ] बॉलिवूडमध्ये आले तेव्हा साध्या मराठी घरातली मुलगी, मी मीडियाने नव्हे, प्रेक्षकांनी बनवलेली तारका झाले, राजकीय आयुष्यातही जनतेने बनवलेली नेता होणार : उर्मिला मातोंडकर [/svt-event]

[svt-event date=”01/12/2020,4:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event date=”01/12/2020,1:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event date=”01/12/2020,1:14PM” class=”svt-cd-green” ] मातोश्रीवर उर्मिला मातोंडकरचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सुरु [/svt-event]

[svt-event date=”01/12/2020,1:04PM” class=”svt-cd-green” ] अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ‘मातोश्री’वर दाखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित

[/svt-event]

[svt-event title=”उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर” date=”01/12/2020,12:54PM” class=”svt-cd-green” ] उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल, थोड्याच वेळात शिवसेनेत प्रवेश करणार [/svt-event]

[svt-event date=”01/12/2020,12:52PM” class=”svt-cd-green” ] अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ‘मातोश्री’च्या दिशेने रवाना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार [/svt-event]

[svt-event date=”01/12/2020,12:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकरचं नाव देण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उर्मिलाने शिवसेनेत प्रवेश घेतला.

मुख्यमंत्री आणि उर्मिला यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली होती. अभिनेत्री कंगना रानौतने बॉलीवूड कनेक्शनच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केले असताना उर्मिला मातोंडकर यांनी सर्वप्रथम तिच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. याशिवाय, उर्मिला मातोंडकर यांचे वक्तृत्त्व, राजकीय समज आणि राज्यपालनियुक्त सदस्यपदासाठीचे निकष पूर्ण करण्याची क्षमता लक्षात घेऊन शिवसेना त्यांना विधानपरिषेदवर पाठवल्याचं म्हटलं आहे.

सहा महिन्यात उर्मिलाची काँग्रेसला सोडचिठ्ठी

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करत उर्मिला मातोंडकरने उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं होतं. पण लोकसभा निवडणुकीत उर्मिलाच्या वाट्याला पराभव आला. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे उर्मिलाने अवघ्या सहा महिन्यात पक्षाला रामराम ठोकला (Actress Urmila Matondkar Will Join ShivSena).

मुंबई काँग्रेसच्या भल्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अंतर्गत राजकारण सोडवण्यासाठी काँग्रेसने माझ्या प्रतिमेचा गैरवापर करुन घेतला, असा दावा करत उर्मिला मातोंडकर यांनी अवघ्या सहा महिन्यात पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.

काँग्रेसची विधान परिषदेची ऑफर नाकारली

आम्ही उर्मिला मातोंडकर यांना संपर्क साधून विधान परिषदेवर जाण्याची ऑफर दिली होती. पण त्यांनी नकार दिला. राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचं त्या म्हणाल्या. आता जर त्यांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली असेल तर त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे, असं मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

Actress Urmila Matondkar Will Join ShivSena

संबंधित बातम्या:

उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेसची विधान परिषदेची ऑफर नाकारली; वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट

उर्मिला मातोंडकरांकडून शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार; सूत्रांची माहिती

विधानपरिषद : उर्मिला आणि नितीन बानुगडे विधानपरिषदेवर, शिवसेनेची चार नावं ठरली !

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.