Prakash Ambedkar : ‘त्या’ हल्ल्याला नागरे पाटील जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा थेट आरोप, दिला पत्राचा संदर्भ

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP leader Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचारी आंदोलकांनी दगड, चपला भिरकावल्या होत्या. यामुळे राज्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी त्यावर प्रतिक्रीया देत निषेध नोंदवला होता. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनीही आपली भुमिका मांडत या हल्ल्याबाबत प्रतिक्रीया दिली होती. […]

Prakash Ambedkar : 'त्या' हल्ल्याला नागरे पाटील जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा थेट आरोप, दिला पत्राचा संदर्भ
अॅड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषदImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 1:57 PM

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP leader Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचारी आंदोलकांनी दगड, चपला भिरकावल्या होत्या. यामुळे राज्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी त्यावर प्रतिक्रीया देत निषेध नोंदवला होता. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनीही आपली भुमिका मांडत या हल्ल्याबाबत प्रतिक्रीया दिली होती. यानंतर अनेक अंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी (Police) आरोप ठेवत आंदोलनकर्त्या एसटी कर्मचार्‍यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्यावर षड्यंत्र रचल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्यांना अजूनही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यानंतर आता या हल्ल्याबाबत अॅड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्यावर आपले मत व्यक्त करताना त्यांनी, ही घटलेली घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी याप्रकरणी सह पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

हल्ल्याची कल्पना पोलिसांना होती 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला होऊ शकतो असे पत्र पोलिसांना चार दिवस आधीच मिळाल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसे पत्र घटनेच्या चार दिवसा आधीच सह पोलीस आयुक्तांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या पत्रात सिल्वर ओकच नव्हे तर मुख्यमंत्री यांचे निवासस्थान मातोश्री बंगला आणि वर्षा हे शासकीय निवासस्थान, परिवहन मंत्री अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान व वांद्रे येथील निवास स्थान या ठिकाणी एस.टी. कर्मचारी हल्ला करू शकतात असे नमूद होते असेही सांगितले. या सर्व बाबींची माहिती असताना सुद्धा पोलीस विभागाच्या चुकीने एवढी मोठी घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या घटनेस जबाबदार असणाऱ्या सह पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांची चौकशी व्हायला हवी होती. मात्र त्यांची चौकशी करण्याऐवजी त्यांनाच सदर चौकशी समितीच्या प्रमुख पदी नियुक्त करणे ही बाब आक्षेपार्ह आहे. त्याबाबत खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, अशीही मागणी आंबेडकर यांनी केली आहे. तसेच त्या घटनेस जबाबदार असलेले सहपोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी सुद्धा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

राज ठाकरे यांची भूमिका

यावेळी महाराष्ट्र पोलिसांच्या कामावर बोट ठेवत सहपोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या निलंबनाची मागणी केल्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर आपली प्रतिक्रीया दिली. यात त्यांनी, राज ठाकरे यांची भूमिका ही दंगल घडविणारी असल्याचे म्हटले. तसेच जिथे जिथे मंदिर आहेत त्या मंदिरांच्या वर भोंगे लावून हनुमान चाळीसा पठण करावे, त्याला काही हरकत नाही. परंतु मस्जिद समोर हनुमान चालीसा भोंगे लावून वाजविणे हे दंगल घडविण्यासाठी प्रवृत्त करण्याची भूमिका राज घेत आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्यावर आयपीसी 153 अन्वये कारवाई होऊ शकते. राज्य सरकार कारवाई का करत नाही हे कळण्यापलीकडे असल्याचेही अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

इतर बातम्या : 

Sharad Pawar on Raj Thackeray: पुन्हा जेम्स लेन! राज ठाकरेंचा आरोप पवारांनी ठामपणे खोडला, जेम्स लेनचं गलिच्छ लिखाण पुरंदरेंच्याच माहितीवर!

Raj Thackery Booked | ठाण्यातील सभेत तलवार दाखवणं अंगलट, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

Jitendra Awhad: राजकीय व्यासपीठावर नवा ‘जॉनी लिव्हर’ आलाय; आव्हाडांचे राज यांना शालजोडीतून फटकारे

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.