दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री, तर हसन मुश्रीफ आणि अजित पवारांची ‘पॉवर’ आणखी वाढली

वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांची ताकदही वाढली आहे.

दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री, तर हसन मुश्रीफ आणि अजित पवारांची 'पॉवर' आणखी वाढली
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 7:41 PM

मुंबई : अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता पवारांचे विश्वासू आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा असं विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवलं आहे. तर गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असंही या पत्रात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे गृहमंत्रीपद वळसे-पाटलांच्या गळात पडल्याचं निश्चित झालं आहे. दरम्यान, वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांची ताकदही वाढली आहे. (Additional charge of Excise and Labor Department to Ajit Pawar and Hasan Mushrif)

दिलीप वळसे पाटील यांना राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आलाय. तशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. त्यामुळे अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांचं मंत्रिमंडळातील पॉवर आता अजून वाढणार आहे.

दिलीप वळसे-पाटलांना गृहखातं

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत अॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान या प्रकरणाचा तपास CBI ने करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांनी आपण नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देत असल्याचं सांगत, आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केलाय. त्यानंतर शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी गृहमंत्रीपदासाठी दिलीप वळसे – पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. आता अनिल देशमुखांचा राजीनामा स्वीकारण्यात यावा आणि वळसे-पाटलांकडे गृहखात्याची जबाबदारी दिली जाणार असल्याचं पत्र मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलं आहे.

कोण आहेत दिलीप वळसे पाटील?

  • दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून त्यांना विधीमंडळाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे.
  • दिलीप वळसे पाटील यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1956 रोजी झाला. 1990 साली आंबेगाव तालुक्‍यात युवा नेतृत्व म्हणून दिलीप वळसे-पाटील यांचा उदय झाला. वडील दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली.
  • दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सातव्यांदा आमदार झाले आहेत.
  • 2009 ते 2014 या कालखंडात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली होती.
  • युतीचे सरकार असताना विधानसभेत चमकदार कामगिरी केल्याने त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला. वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा, उत्पादन शुल्क, कामगार विभागासारख्या महत्त्वाचे खात्यांचे मंत्री म्हणून काम सांभाळले आहे.
  • मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्विकारल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.
  • राजकीय उलथापालथीच्या काळात आणि भाजपकडून आक्रमकपणे हल्ला होत असताना विधानसभा अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यांच्या विधीमंडळ कामाच्या आणि कायदेशीर प्रक्रियांच्या खडानखडा माहितीमुळे आघाडी सरकारला चांगलंच बळ मिळालं होतं.

संबंधित बातम्या :

Anil Deshmukh resigns : अखेर अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा

100 कोटी वसुलीचे आरोप असलेल्या अनिल देशमुखांकडे कोटींची संपत्ती; रिलायन्सशी भागीदारी

Additional charge of Excise and Labor Department to Ajit Pawar and Hasan Mushrif

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.