Adhir Ranjan Chowdhury : “नाव अधीर पण डोकं बधीर”, राष्ट्रपतींचा राष्ट्रपत्नी उल्लेख केल्याने चौधरींविरोधात भाजप आक्रमक मोडमध्ये

आता राज्यातल्या भाजप नेत्यांनीही आधीर रंजनी चौधरी यांच्यावरती जोरदार निशाणा साधायला सुरुवात केली आहे. नाव अधीर आहे, मात्र यांचं डोकं बधिर आहे. अशा शब्दात रिपाई नेते रामदास आठवले यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Adhir Ranjan Chowdhury : नाव अधीर पण डोकं बधीर,  राष्ट्रपतींचा राष्ट्रपत्नी उल्लेख केल्याने चौधरींविरोधात भाजप आक्रमक मोडमध्ये
"नाव अधीर पण डोकं बधीर", राष्ट्रपतींचा राष्ट्रपत्नी उल्लेख केल्याने चौधरींविरोधात भाजप आक्रमक मोडमध्येImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 5:25 PM

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) दिल्लीतला माहोल आधीच गरमागरमीचा असताना आज काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी (Adhir Rajan Chowdhury) यांच्या एका विधानाने पुन्हा त्या आगीत आणखी तेल ओतलं गेलं आहे. अधीर रंजन चौधरी बोलायला उभा राहिल्यानंतर त्यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांचा राष्ट्रपती उल्लेख करण्याऐवजी राष्ट्रपत्नी असा उल्लेख केला. त्यानंतर हे विधान मी चुकून बोललो, आता फाशी देता का? मला असा सवाल चौधरी यांनी केला. मात्र या प्रकारानंतर भाजप सध्या चांगलीच आक्रमक मोडवरती आली आहे. सोनिया गांधी देशाची माफी मागावी, अशी मागणी तात्काळ भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्याकडून ठेवण्यात आली. तर आता राज्यातल्या भाजप नेत्यांनीही आधीर रंजनी चौधरी यांच्यावरती जोरदार निशाणा साधायला सुरुवात केली आहे. नाव अधीर आहे, मात्र यांचं डोकं बधिर आहे. अशा शब्दात रिपाई नेते रामदास आठवले यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तर भाजपनेच्या चित्रा वाघ यांनी अधीर की बधिर? असा थेट सवाल केला आहे.

रामदास आठवले काय म्हणाले?

याबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतीपदाचा अपमान केला आहे. यांचं नाव अधीर आहे पण यांचं डोकं बधिर झालं आहे. तसेच सोनिया गांधी यांना त्यांच्या पदावरून हटवावं, बोलायचं स्वातंत्र आहे, म्हणजे असं बोलणं योग्य नाही. आम्ही यांचा निषेध करतो, या शब्दात आठवले यांनी चौधरी यांच्यावर सडकून टीका केली आहे, तर दुसरीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ यांची यावरती खरमरीत प्रतिक्रिया आली आहे.

चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

Koo App

लोकसभेतील #INCIndia चे गटनेते #adhirrcinc यांनी महामहिम राष्ट्रपती यांचा ’ राष्ट्रपत्नी’ असा मुर्खपणाने उल्लेख करून भोचकगिरी केली आहे चुकून बोललो.. आता फाशी देता का मला..हे त्यावरचे अधीर यांचे उत्तर अधिक संतापजनक आहे. असे सेल्फगोल करणारे नेते असतील तर कल्याणच आहे हे अधीर की बधीर.? #BJP4IND #BJPMaharashtra #BjpMumbai

Chitra Kishor Wagh (@ChitraKishorWaghCRKB) 28 July 2022

बंगाली भाषेमुळे चुकून झालं

तर चौधरी हे बंगालचे असल्यामुळे त्यांच्या तोंडून चुकून हा शब्द गेला. बंगाली भाषेमुळे असं झालं, भाजप विनाकारण हा मुद्दा रेटत आहे. काँग्रेसनेच या देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती दिल्या. मग आम्ही अपमान कसा करू? उलट स्मृती इराणी यांनी सोनिया गांधी यांचा अपमान केला. अशी प्रतिक्रिया यावरती राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगडी यांनी दिली आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.