Adhir Ranjan Chowdhury : अधीर रंजन चौधरी यांच्याकडून राष्ट्रपतींचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’, लोकसभेत गोंधळ, सोनिया Vs स्मृती ‘सामना’
Adhir Ranjan Chowdhury : अधीर रंजन चौधरी यांचं विधान चर्चेत...
नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी त्यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत त्यांनी आक्षेपार्ह विधान केलंय.त्यामुळे लोकसभेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेचं कामकाज बंद पाडत भाजप खासदारांनी माफीची मागणी केली. तर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सत्ताधारी भाजप खासदारांच्या आक्षेपाला उत्तर दिलंय. एका मुलाखती दरम्यान अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला. त्यावर भाजपच्या वतीने आक्षेप घेण्यात आला. त्याचे पडसाद लोकसभेतही पाहायला मिळाले. तर सोनिया गांधी यांनी “डोन्ट टॉक टू मी”, असं म्हणत सहागृहातून बाहेर पडल्या. तर अर्थमंत्री निर्मला सीतारण यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पक्षाच्या महिला खासदारांनी संसद भवनाबाहेर निदर्शने केली.
अधीर रंजन चौधरी यांचं विधान चर्चेत
एका मुलाखती दरम्यान अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला. त्यावर भाजपच्या वतीने आक्षेप घेण्यात आला. त्यांच्या या विधानाची चर्चा होतेय. त्याचे पडसाद लोकसभेतही पाहायला मिळाले.
भाजपचा आक्षेप
अधीर रंजन चौधरी यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्यांच्या या विधानाची भाजपच्या वतीने गंभीर दखल घेण्यात आली आहे. चौधरी यांनी माफी मागावी, अशी मागणी सध्या केली जात आहे. “काँग्रेस हा महिलाविरोधी पक्ष आहे. काँग्रेस आदिवासी विरोधी पक्ष आहे. आदिवासी राष्ट्रपती काँग्रेसला सहन होत नाही. त्यांच्या डोळ्यात खुपतं. काँग्रेसने राष्ट्रपतींची खिल्ली उडवली आहे. काँग्रेस पक्षाने द्रौपदी मुर्मूची माफी मागावी”, अशा शब्दात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारण यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पक्षाच्या महिला खासदारांनी संसद भवनाबाहेर निदर्शने केली.
माफी मागण्याचा प्रश्नच नाही -अधीर रंजन चौधरी
तर दुसरीकडे काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. “मी चुकून ‘राष्ट्रपत्नी’ म्हणालो होतो. मी ठरवून ही बाब केली नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. भाजप जाणीवपूर्वक तिळाचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न करत आहे. आता तुम्हाला यासाठी मला फाशी द्यायची असेल तर देऊ शकता”, असं अधीर रंजन चौधरी म्हणालेत.