Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aditya Thackeray Ayodhya Visit : पोस्टर लागले, टीझरही आला, युवराजांच्या दौऱ्यासाठी अयोध्या सज्ज, संपूर्ण दौरा एका क्लिकवर

 हनुमान गढी, राम जन्मभूमी लक्ष्मण किल्ला येथे तसेच राऊतांनी शरयू तिरीही भेट दिली आहे. याच ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरती पार पडणार आहे. आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे शहरभर पोस्टर लागले आहेत. 

Aditya Thackeray Ayodhya Visit : पोस्टर लागले, टीझरही आला, युवराजांच्या दौऱ्यासाठी अयोध्या सज्ज, संपूर्ण दौरा एका क्लिकवर
आयपीएलसारखे प्राईस टॅगवाले लोक आपल्याला नकोत, नगरसेवकांच्या बैठकीत आदित्य ठाकरे आक्रमक, 10 मोठे मु्द्देImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 10:03 PM

अयोध्या : शिवसेनेच नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याचा (Ayodhya Visit) सध्या देशभर बोलबाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात हा अयोध्या दौरा गाजत आहे. या दौऱ्याआधी शिवसेनेकडून (Shivsena) जय्यत तयारी करण्यात आलीय.  आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा नवा टिझर नाशिक शिवसेनेकडून रिलीज करण्यात आला आहे. उद्याच्या दौऱ्या आधी शिवसेना नेत्यांकडून आजच अयोध्येत दाखल होत तयारीचाही आढावा घेतला जात आहे. संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला श्रीराम जन्मभूमी स्थळाच्या तयारीची पाहाणी केली.  हनुमान गढी, राम जन्मभूमी लक्ष्मण किल्ला येथे तसेच राऊतांनी शरयू तिरीही भेट दिली आहे. याच ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरती पार पडणार आहे. आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे शहरभर पोस्टर लागले आहेत.

आदित्य यांच्या दौऱ्याचा नवा टीझर

असा असेल आदित्य ठाकरेंचा दौरा

  1. सकाळी 11.00 वाजता लखनौ विमानतळावर आगमन
  2. अयोध्येत दुपारी 1.30 वाजता आगमन, इस्कॉन मंदिर, राम नगर, (भोज) बीजे हॉटेल
  3. दुपारी  2.30 हॉटेल पंचशील, अयोध्या
  4. दुपारी 3.30 : पत्रकार परिषद, हॉटेल पंचशील, अयोध्या
  5. हनुमान गढी, 4:30 वाजता दर्शन
  6. सायंकाळी 5.00 वाजता रामललाचे दर्शन, श्री रामजन्मभूमी
  7. 6:00 वाजता- लक्ष्मण किल्ला
  8. शरयू आरती, नया घाट, अयोध्या संध्याकाळी 6.45 वाजता
  9. लखनौसाठी 7.30 वाजता प्रस्थान

अनेक नेते अयोध्येत दाखल

या दौऱ्यासाठी अनेक शिवसेना नेते अयोध्येत दाखल झाले आहेत. आमच्यात प्रचंड ऊत्साह आहे. आम्ही तारीख दिली आम्ही आलो. ज्यांनी तारीख दिली ते आले नाहीत, आम्ही बीकेसीच्या सभेत तारीख दिली आणि इथे पोहोचले, इथे पोहोचलो असे म्हणत राज ठाकरेंवर वरून सरदेसाई यांनी टीका केली आहे. तसेच ऊत्तर भारतात एक मोठा वर्ग आहे जो आदित्य यांना मानतो, त्यामुळे त्यांनी इथे येणं एक जीवाभावाचा विषय आहे. राम लल्ला हा आमच्या आस्थेचा विषय, यापूर्वीही इथे आम्ही आलो होतो, आत्ता पुन्हा येतोय, आम्हाला तारखा देऊन माघार घ्यावी लागत नाही, तसेच आम्हाला फायरब्रॅंड बनायची गरज नाही, इथले लोक शिवसेनेबद्दल चांगली भावना ठेवतात, हिंदू बांधव आजही आमच्या सोबत आहेत, दोन वेळा आम्ही आयोध्या दौरा केला, हा दौरा ही यशस्वी होईल, असेही ते म्हणाले आहेत.

मोठ्या संख्येने शिवसैनिकही अयोध्येत

अध्यक्ष आदित्य ठाकरे आयोध्या दौरा करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शिवसैनिक अयोध्येत मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. दुपारी चार वाजेच्या सुमारास कोल्हापूरचे युवा सैनिक रेल्वेने अयोध्या इथं दाखल होताच जय श्रीरामचा जयघोष करत रेल्वे स्थानकावरच आनंदोत्सव साजरा केला आहे. तसेच ठाण्याहून शिवसैनिकांना घेऊन निघालेली विशेष ट्रेन काही वेळापूर्वीच उत्तर प्रदेशातील प्रयागराज रेल्वे स्थानकात दाखल झाली. यावेळी शिवसैनिकांकडून ग्यानबा तुकारामचा गजर करत प्रयागराज रेल्वे स्थानकातच रिंगण करण्यात आलं.

राज ठाकरेंना विरोध करणारे बृजभूषण सिंह काय म्हणले?

यावेळी आम्ही राज ठाकरेंच्या दौऱ्याला ज्या भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला. त्यांची प्रतिक्रियाही आम्ही जाणून घेतली आहे. माझा राज ठाकरे यांना विरोध आहे. त्यांची पत्नी,आई आणि मुलगा कोणीही आलं तर त्यांचं आदरातिथ्य मी स्वतः करणार पण राज ठाकरे हे दौऱ्याला आले तर माझा विरोध असणार आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला माझा विरोध नाही त्यांनी यावं आणि राम लल्लाच दर्शन घ्यावं. या अगोदर सुद्धा मी याविषयावर बोललो आहे. राज ठाकरे हे मुळात हिंदुत्ववादी नाहीच आहेत, असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर आक्षेप नोंदवला नाही तर राज ठाकरेंच्या दौऱ्याचा आक्षेप कायम आहे.

आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.