आदित्य ठाकरेंचा मावसभाऊ वरुण सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात?

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आदित्य ठाकरेंचा मावसभाऊ वरुण सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात?
Follow us
| Updated on: Oct 02, 2019 | 9:56 AM

मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे कुटुंबाचा पहिला सदस्य निवडणुकांच्या रिंगणात उतरत आहे. आदित्य ठाकरेंसोबतच त्यांचा मावसभाऊ वरुण सरदेसाई हेसुद्धा (Varun Sardesai may contest election) विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावणार असल्याची चर्चा आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सरदेसाई निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चिन्हं आहेत.

युतीच्या जागावाटपात शिवसेनेने आग्रहाने भाजपकडून कल्याण पश्चिम मतदारसंघ मागून घेतला आहे. या मतदारसंघाबाबत सेनेने चाचपणी केली आहे. कल्याण पश्चिमसाठी शिवसेनेतून विजय साळवी इच्छुक उमेदवार असूनही पक्षनेतृत्वाने त्यांना एबी फॉर्म दिलेला नाही.

वरुण सरदेसाई यांच्याबाबत पक्षात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, पण दोन दिवसात उमेदवारीबाबत ठरण्याची शक्यता आहे.

कोण आहेत वरुण सरदेसाई?

वरुण सतीश सरदेसाई (Varun Sardesai may contest election) हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या भगिनीचे पुत्र. वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेच्या सचिवपदाची जबाबदारी आहे, तसंच वरुण यांच्याकडे शिवसेनेच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. सरदेसाईंनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी संपादन केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी जाहीररित्या सर्वप्रथम मागणी वरुण यांनीच केली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरुण सरदेसाई हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरुण सरदेसाई यांचा मोठा सहभाग होता.

ठाकरे घराण्याला इतिहास रचण्यासाठी राज ठाकरेंची साथ?

गेल्या वेळी मुंबई सिनेट निवडणुकीच्या युवासेनेच्या व्यूहरचनेत वरुण सरदेसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सर्व 10 जागा जिंकून युवासेनेने विक्रम रचला होता.

2017 मधील कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पेलली होती. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदेंसाठी त्यांनी प्रचार केला होता.

ठाकरे कुटुंबातील व्यक्तीने ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश करणं म्हणजे या जिल्ह्यावर अंमल असलेल्या एकनाथ शिंदे यांना पक्षातूनच शह देण्याची खेळी असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.