Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aditya Thackeray : ‘त्यांनी कितीही नाकारलं तरी त्यांच्या माथ्यावर गद्दार लिहिलेलं दिसणार’, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदे आणि बंडखोरांवर हल्लाबोल

त्यांनी कितीही सांगितलं तरी त्यांच्या माथ्यावर गद्दार लिहिलेच दिसणार. तुम्हाला सगळं काही दिलं, तुम्हाला काय कमी केलं? तुम्ही गद्दारी का केली? हेच त्यांना हात जोडून नम्रपणे विचारा, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलंय.

Aditya Thackeray : 'त्यांनी कितीही नाकारलं तरी त्यांच्या माथ्यावर गद्दार लिहिलेलं दिसणार', आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदे आणि बंडखोरांवर हल्लाबोल
आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुखImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 8:59 PM

औरंगाबाद : शिवसंवाद यात्रेनिमित्त युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज औरंगाबादेत आले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. ‘ही गद्दारी झाली तेव्हा आपण डोळे झाकून बसलो. त्यांनी हातात कधी खंजीर कधी घेतला आपल्याला कळलंच नाही. त्यांनी कितीही सांगितलं तरी त्यांच्या माथ्यावर गद्दार लिहिलेच दिसणार. तुम्हाला सगळं काही दिलं, तुम्हाला काय कमी केलं? तुम्ही गद्दारी का केली? हेच त्यांना हात जोडून नम्रपणे विचारा’, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना (ShivSainik) केलंय.

आदित्य ठाकरे म्हणाले की, सगळीकडे फक्त आणि फक्त शिवसैनिक दिसतोय. आता माझी एवढीच इच्छा आहे गद्दांनीही येऊन बघावं आणि लोकांच्या मनात त्यांच्याबाबत काय भावना आहेत हे जाणून घ्यावं. एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की जे अनेक वर्ष आपण स्वप्न बघितलं ते काम उद्धव ठाकरे यांनी करुन दाखवलं ते म्हणजे संभाजीनगर. गेले अडीच वर्षे मी पाहतोय, उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले. त्यांचा पहिला निर्णय रायगड किल्ल्याला 600 कोटी रुपये आणि शेवटचा निर्णय होता तो संभाजीनगरचा. कालपासून या शिवसंवाद यात्रेत फिरतोय. मुंबई, महाराष्ट्रात फिरतोय. सगळीकडे एकच भावना दिसतेय ती म्हणजे उद्धवसाहेबांबाबत प्रेम आणि आशीर्वाद दिसतोय.

‘संभाजीनगरवासियांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना उपरती आली’

महाराष्ट्राची जनता हुशार आहे, ती सगळं पाहतेय. हे सर्व होत असताना मला पाहायला मिळतंय की मी जिथून येतोय तिथे मला थांबवून स्वागत केलं जातंय आणि मला सांगितलं जायंय की उद्धवसाहेबांना सांगा की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आपण संभाजीनगर नाव दिल्यानंतर नव्या सरकारनं निर्णयाला स्थगिती दिली. मला वाटतं इकडे सगळ्या संभाजीनगरवासियांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना उपरती आली आणि पुन्हा त्यांनी संभाजीनगर नाव केलं. आपण नाव बदलताना कुठल्याही जाती, धर्मात तेढ निर्माण झाला नाही, कुठे दंगली घडल्या नाहीत, याचा मला अभिमान आहे. आपण औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं. अयोध्येला आपण चार पाच वेळा गेलो. हे सगळं करत असताना कुठेही जात-पात, धर्मावरुन दंगली घडल्या नाहीत, असा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय.

औरंगाबाद आणि मराठवाड्यातील कामांचा पाढाच वाचला

सुभाष देसाईंसारखा खरा शिवसैनिक आपल्यासोबत आहे. आज ते 80 वर्षाचे असतील. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उद्योगखातं, संभाजीनगरचं पालकमंत्रीपद सांभाळलं. त्यांनी संभाजीनगरच्या विकासासाठी भरीव योगदान दिलं. मी ही संभाजीनगरला येताना कधीही राजकीय कार्यक्रमासाठी नाही तर विकासकामांच्या भूमिपूजनासाठी किंवा उद्घाटनासाठी आलो. या संभाजीनगरमध्ये अनेक वर्षे मी आलो, शिवसैनिक, युवासैनिक म्हणून आलो. तेव्हा नागरिकांची मला तक्रार असायची की इथले रस्ते नीट करा. आपल्या महापालिकेकडे तेवढा निधीच नव्हता की आपण रस्ते चांगले करु शकू. पण आपण 540 कोटी रुपये मंजूर करुन घेतले आणि रस्त्याची कामं हाती घेतली. पाण्याची योजना, सफारी पार्क अशी अनेक कामं आपण केली. अजित पवारांकडे मी हट्ट धरला आणि त्यांच्याकडून 100 कोटी अजिंठा, वेरुळ आणि संभाजीनगरच्या पर्यटनासाठी आपण निधी दिली. आज ते सांगत सुटलेत की काही निधी दिला नाही. पण आजवर मिळाला नाही तेवढा निधी आपण या गद्दारांना दिला होता, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि बंडखोर आमदारांवर हल्ला चढवला.

‘गद्दार आमच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हते’

सगळं काही ठीक सुरु असताना गद्दारी करण्याची गरज काय पडली? नेमकं असं काय घडलं? हे बेकायदेशीर सरकार कोसळणार आहे. पण हे सगळं होत असताना विधानसभेत माझ्यासोबत 15 आमदार होते. आम्ही सगळे सोबत बसलेलो. तेव्हा तात्पुरते समोर ते बसले होते. जेव्हा ते समोर बसलेले आम्ही स्वाभिमानाने त्यांच्याकडे पाहत होतो आणि समोर बसलेले गद्दार आमच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हते. त्यांचे खरे मुखवटे आता फाटले आहेत. आतापर्यंत सांगत होते की ठाकरे आणि शिवसेनेबाबत आदर आहे, पण काल आणि आज बघा त्यांची वक्तव्य समोर येत आहेत. आता ते धमक्या द्यायला लागले आहेत. त्यांनी आपलं इमान का विकलं? आम्ही नक्की चुकीचं काय केलं? सगळं काही ठीक चाललं होतं, महाराष्ट्र पुढे चालला होता, अनेक विकासकामं सुरु होती. कोविडचा काळ नीट हाताळला आपण, असही आदित्य ठाकरे म्हणाले.

राजकारणात चांगल्या लोकांना स्थान मिळवून देणार

आम्ही जास्ती दिलं आणि अपचन यांना झालं, त्याचा त्रास मात्र आपल्याला होत आहे. अपचन झाल्यावर जेलोसिल घ्यावी लागते, कदाचित जेलोसिल घेण्यासाठीच ते पलिकडे गेले असावेत. राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं असं मला अनेकांनी सांगितलं. त्यांनी बाळासाहेबांच्या पुत्राला, शिवसेना पक्षपमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरुन बाजूला केलं ते कदाचित हेच सिद्ध करण्यासाठी. पण मी राजकारणात चांगल्या लोकांना स्थान मिळवून देणार म्हणजे देणारच, असा दावाही त्यांनी शिवसंवाद यात्रेत केला.

कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका.
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू.
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले.
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले.
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी.