खोके कुणाकडे किती पोहोचले यावरून आता आमदारांमध्ये भांडण, आदित्य ठाकरे यांचा खोचक टोला

| Updated on: Oct 26, 2022 | 3:44 PM

पुन्हा एकदा खोक्यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापल्याचं पहायला मिळत आहे.  खोके कुणाकडे किती पोहोचले यावरून आता आमदारांमध्ये भांडण सुरू झाल्याचा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

खोके कुणाकडे किती पोहोचले यावरून आता आमदारांमध्ये भांडण, आदित्य ठाकरे यांचा खोचक टोला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : पुन्हा एकदा खोक्यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापल्याचं पहायला मिळत आहे.  खोके कुणाकडे किती पोहोचले यावरून आता आमदारांमध्ये भांडण सुरू झाल्याचा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे गटाला लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bachu Kadu) यांच्या वादावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटावर निशाणा साधला. मात्र लगेचच  राणा यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर बसून खोक्याचं राजकारण सुरू केलं असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडूनच खोक्याची प्रथा सुरू झाल्याचा टोला राणा यांनी लगावला आहे.

नेमकं काय म्हटलं आदित्य ठाकरे यांनी?

आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा खोक्यावरून शिंदे गटाला जोरदार टोला लगावला आहे. खोके कोणाकडे किती पोहोचले यावरून दोन – तीन आमदारांमध्ये आता भांडण सुरू झाल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. चाळीस गद्दार गेले मात्र नवे सहकारी आमच्यासोबत येत आहेत. त्यामुळे समाधान वाटत असून, त्यांना घेऊन आम्ही पुढे जात असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

राणा यांचं प्रत्युत्तर

दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या टीकेला रवी राणा यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई महापालिकेत जे खोक्याचं राजकारण सुरू झालं, ते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीच सुरू केलं. मुंबईच्या ज्या माजी महापौर आहेत किशोरी पेडणेकर यांनी उद्धव ठाकरे यांना किती खोके पोहोचवले, हे संपूर्ण मुंबईमधील जनतेला माहीत आहे. खोक्याशिवाय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं पान हलत नाही असं राणा यांनी म्हटलं आहे.