आज शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya thackeray Live) हे टीव्ही 9 च्या कार्यालयात येणार आहेत. त्यांच्या हस्ते ‘टीव्ही 9’ च्या बाप्पाची पूज पार पडणार आहे. यानंतर आदित्य ठाकरे हे ‘टीव्ही 9’मराठीला विशेष मुलाखत (Aditya thackeray Exclusive Interview Live) देखील देणार आहेत. सध्या शिवसेनेमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. मात्र या सर्व परिस्थितीला आदित्य ठाकरे हे मोठ्या धिराने तोंड देत आहेत. पक्षबांधणीसाठी ते राज्यभर दौरे काढत आहेत. त्यांच्या दौऱ्याला नागरिकांची मोठी गर्दी देखील जमत असल्याचं पहायला मिळतं. या सर्व पार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरे नेमकं काय बोलणार (Aditya thackeray Interview) याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.