Aditya Thackeray Nomination | आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

आदित्य ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे कुटुंबाचा पहिला सदस्य निवडणुकांच्या रिंगणात उतरत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीचं मोठं शक्तीप्रदर्शन पाहायला मिळणं साहजिक आहे

Aditya Thackeray Nomination | आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Follow us
| Updated on: Oct 03, 2019 | 12:39 PM

मुंबई : आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज (Aditya Thackeray filing Nomination) दाखल केला आहे. आदित्य ठाकरे अर्ज भरताना वडील आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आई रश्मी ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित होते.

[svt-event title=”आदित्य ठाकरे ‘मातोश्री’वरुन रवाना” date=”03/10/2019,10:19AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज भरताना एकप्रकारे महायुतीचं शक्तीप्रदर्शन करण्याचा शिवसेना-भाजपचा इरादा आहे. आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.

लोअर परळ येथील ‘शिवालय’ या शिवसेना शाखेतून आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज (Aditya Thackeray filing Nomination) भरायला निघाले. बीडीडी चाळ-वरळी नाका मार्गे निवडणुक कार्यालयात उमेदवारी अर्ज भरायला ते दाखल झाले.

Aditya Thackeray filing Nomination

आदित्य ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे कुटुंबाचा पहिला सदस्य निवडणुकांच्या रिंगणात उतरत आहे. त्यांना काका आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अप्रत्यक्ष साथ लाभली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनसे वरळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढणार नाही. राज ठाकरे यांनी स्वत: हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने वरळीतून गौतम गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गायकवाड हे माजी पोलिस अधिकारी आहेत. आदित्य ठाकरेंविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे घटनातज्ञ अॅड. सुरेश माने हे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरेंनी मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. यातून त्यांनी विधानसभा निवडणुकीत शक्तीनिशी उडी घेतल्याचं बोललं जात आहे. भाजप-शिवसेना युतीच्या अधिकृत घोषणेनंतर आदित्य ठाकरेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी असलेले सचिन अहिर शिवसेनेत सामील झाल्यामुळे वरळीतून लढताना आदित्य ठाकरेंच्या बाहूत अधिक बळ आलं आहे. मनसेनेही तलवार म्यान केल्यास मराठी मतं आदित्य ठाकरेंना मिळतील, यात शंका नाही. त्यातच गुजराती आणि दाक्षिणात्य भाषांमध्ये पोस्टरबाजी करत आदित्य ठाकरेंनी अमराठी भाषिकांनाही वळवण्याचा प्रयत्न केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा करताना ठाकरे कुटुंबीयांसह शिवसेनेचे नेतेही उपस्थित होते. परंतु उद्धव ठाकरे ‘मातोश्री’वर बंडोबांना शांत करत असल्यामुळे लेकाच्या ऐतिहासिक घोषणेचे ते प्रत्यक्ष साक्षीदार होऊ शकले नाहीत.

संबंधित बातम्या :

आदित्य ठाकरेंविरोधात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जाहीर

आदित्य ठाकरेंचा मावसभाऊ वरुण सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात?

ऐतिहासिक झेप घेतोय, निवडणूक लढवतोय : आदित्य ठाकरे

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.