दोन मतदारसंघांची चाचपणी, मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने आदित्य विधानसभेच्या रिंगणात?

| Updated on: Jun 07, 2019 | 3:31 PM

आदित्य काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना निवडणूक लढवयाचीच असेल तर विधानसभा लढवा असा सल्ला दिला.

दोन मतदारसंघांची चाचपणी, मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने आदित्य विधानसभेच्या रिंगणात?
Follow us on

वृषाली कदम-परब, टीव्ही 9 मराठी, मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सक्रीय राजकारणातून संसदीय राजकारणात येणार का, निवडणूक लढवणार का हे प्रश्न अनुत्तरीत असताना, आता नवी माहिती समोर येत आहे. आदित्य ठाकरे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेतच, मात्र ते लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांच्या माहितीनुसार, “आदित्य ठाकरे यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती, पण आदित्य ठाकरेंनी इतक्यात लोकसभा लढवू नये असा सल्ला शिवसेनेच्या थिंक टँकने दिला. इतकंच नाही तर स्वतः उद्धव ठाकरे यांचंही हेच मत होतं. पण आदित्य काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना निवडणूक लढवयाचीच असेल तर विधानसभा लढवा असा सल्ला दिला.  त्यामुळे अखेर आदित्य ठाकरे यांनी मुखमंत्र्यांचं ऐकलं आणि विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला”

दोन मतदारसंघांची चाचपणी

दरम्यान. आदित्य ठाकरे विधानसभा लढवण्याच्या तयारीत असल्याने त्यांच्यासाठी वांद्रे सी लिंक ने जाता येईल असा घराजवळचा हायप्रोफाईल वरळी मतदारसंघ आणि मोठ्या मताधिक्याने निवडून जायचं असेल तर शिवडी विधानसभा असे दोन मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

उपमुख्यमंत्रिपदाची चर्चा

भाजप-शिवसेना युतीला लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळालं. त्यानंतर आता विधानसभा निवडणूकही दोन्ही पक्ष युती करुनच लढणार आहेत. मात्र युती होताना दोन्ही पक्षात काही अटी ठरल्या आहेत. त्यानुसार मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद ठरलं आहे. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वीच रंगली होती. मात्र शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यामध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं होतं.

संबंधित बातम्या  

आदित्य ठाकरे शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा?  

स्पेशल रिपोर्ट : वांद्रे ते वरळी, आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघ कोण सोडणार?   

निवडणूक लढवायला हिंमत लागते म्हणणाऱ्या निलेश राणेंना शिवसेना नगरसेवकाचं उत्तर