“उद्योगमंत्री कोण आहेत?, गद्दार!”, आदित्य ठाकरे आणि शिवसैनिकांमध्ये जुगलबंदी
आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.
रत्नागिरी : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. या भाषणादरम्यान त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी वेदांता प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला त्यावर आदित्य बोलत होते. तेव्हा त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना पुन्हा एकदा गद्दार संबोधलं. उद्योगमंत्री कोण आहेत? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर सभेसाठी जमलेल्या शिवसैनिकांनी गद्दार, असं उत्तर दिलं. तीन वेळा आदित्य यांनी हा प्रश्न विचारला आणि शिवसैनिकांनी त्यांना गद्दार म्हणत दाद दिली. आदित्य आणि शिवसैनिकांमध्ये रंगलेली ही जुगलबंदी सध्या चर्चेचा विषय ठरतेय.