पुन्हा वेळ आणि शक्ती का वाया घालवताय? आदित्य ठाकरेंचा जावडेकरांना सवाल

ताडोबा-अंधारीच्या वन्यजीव कॉरिडॉरचा नाश होणार आहे हे माहित असताना या प्रक्रियेसाठी पुन्हा वेळ आणि शक्ती का वाया घालवायची? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी पत्रात उपस्थित केला आहे.

पुन्हा वेळ आणि शक्ती का वाया घालवताय? आदित्य ठाकरेंचा जावडेकरांना सवाल
Follow us
| Updated on: Jun 23, 2020 | 8:41 AM

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण क्षेत्राच्या प्रस्तावित लिलावाच्या मुद्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिले आहे. “आपल्या वन्यजीव कॉरिडॉरचा आपण असा नाश करु शकत नाही” अशा शब्दात आदित्य यांनी प्रस्तावित लिलावाला विरोध दर्शवला. (Aditya Thackeray opposes proposed auction of mine site near Tadoba- Andhari Tiger Reserve writes to Prakash Javadekar)

यापूर्वी 1999 आणि 2011 मध्ये मूल्यमापन केल्यानंतर लिलाव रद्द करण्यात आला होता. जर ताडोबा-अंधारीच्या वन्यजीव कॉरिडॉरचा नाश होणार आहे हे आपल्याला माहित आहे, तर आपण या प्रक्रियेसाठी पुन्हा वेळ आणि शक्ती का वाया घालवायची? असा प्रश्नही त्यांनी पत्रात उपस्थित केला आहे.

जवळपास दहा वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी हा नाश थांबवला होता. त्यांनी या क्षेत्राचे सर्वेक्षण केले होते आणि खाण साइट योग्य नाही असे अहवालात सूचित केले होते. या भागाचे पुन्हा संरक्षण करावे, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी जावडेकरांना केली.

हेही वाचा : अदिती तटकरेंवर भाजप आमदारही नाराज, रायगडमध्ये सेना-भाजप एकजूट?

प्रस्तावित बंदर कोळसा खाण प्रकल्प हा वन्यजीव कॉरिडॉरमध्ये आहे. हे क्षेत्र विशेषत: व्याघ्र कॉरिडॉरमध्ये असल्याने यापूर्वी खाण प्रकल्पास नामंजुरी देण्यात आली होती. तत्कालीन मुख्य वनसंरक्षक आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक यांनीही यावर आक्षेप घेतला होता. या खाण प्रकल्पामुळे मध्य भारतात असलेले व्याघ्र संरक्षित क्षेत्र आणि वनक्षेत्र विस्कळीत होईल, याकडेही आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले.

(Aditya Thackeray opposes proposed auction of mine site near Tadoba- Andhari Tiger Reserve writes to Prakash Javadekar)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.