मुंबई : ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गट उत्साहाचे वातावरण आहे. शिंदे गटानं नाव आणि चिन्ह चोरण्याचा प्रयत्न केला असा घणाघाती आरोप युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अभिमानाने हे नाव आणि चिन्ह देश्यात आणि राज्यात नेऊ आदित्य ठाकरे म्हणाले. यात उद्धव आहेत बाळासाहेब नाव आहे.
महाराष्ट्र वाचवण्यासाठी आमच्या हातात मशाल आली आहे. धगधगती मशाल लोकपंर्यत नेऊ असे आदित्य ठाकरे म्हणाले.
नाव आणि चिन्ह चोरण्याचं काम करतात. आम्ही सत्याच्या बाजूने आहोत. बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळावर मशाल आहे. हुतात्मा चौकातही धगधगती मशाल आहे. धनुष्यबाण याची लढाई आम्ही पुढे कशी लढायची ती लढू.
खोके सरकार म्हणून त्यांची ओळख आहे. याच खोके सरकार विरोधात आम्ही मशाल पेटवली आहे.