वेदांता – फॉक्सकॉननंतर आदित्य ठाकरेंचा सरकारवर आणखी एक मोठा आरोप

वर्सोवा बांद्रा सी लिंकचं काम बंद पाडलं गेलं, आता या कामासाठी जे इंजीनिअर्स लागणार आहेत, त्यांच्यासाठी मुलाखतीची जाहिरात ही चेन्नईत का दिली जात आहे, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

वेदांता - फॉक्सकॉननंतर आदित्य ठाकरेंचा सरकारवर आणखी एक मोठा आरोप
आदित्य ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 2:54 PM

मुंबई : माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज राज्यातील शिंदे सरकारवर प्रकल्पांबाबत घणाघाती आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत आरोप करताना त्यांनी वेदांता-फॉक्सकॉनमुळे राज्याचं किती नुकसान झालं याची आठवण करुन दिली. बल्कड्रग (bulk drug) पार्कही राज्याबाहेर गेल्याने किती रोजगार गेले याची देखील आठवण करुन दिली, पण आदित्य ठाकरे यावरच थांबले नाहीत. आदित्य ठाकरे यांनी वर्सोवा ब्रांद्रा सी लिंकविषयी सर्वात मोठा आरोप राज्य सरकारवर (State Govt) केला आहे. राज्याच्या बाहेर प्रकल्प जाणे या विषय वेगळा,पण राज्यात जे प्रकल्प राबवले जात आहेत, त्याच्या मुलाखतींची जाहिरात ही इतर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये दिली जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

वर्सोवा बांद्रा सी लिंकचं काम बंद पाडलं गेलं, आता या कामासाठी जे इंजीनिअर्स लागणार आहेत, त्यांच्यासाठी मुलाखतीची जाहिरात ही चेन्नईत का दिली जात आहे.

महाराष्ट्राच्या तरुण-तरुणींकडे देखील हे स्कील असताना ही जाहिरात परराज्यात का. आमच्या मुलांचं यात नुकसान होतंय, ही जाहिरात मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर किंवा अमरावतीत दिली तर आमचे तरुण मुलाखतीला पोहोचतील.

हे सुद्धा वाचा

पण या तरुण-तरुणींना यापासून का दूर ठेवलं जात आहे, जाहिराती या चेन्नईत का दिल्या जात आहेत, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे, तसेच मुख्यमंत्री महोदयांनी यावर उत्तर द्यावं अशी मागणी केली आहे.

जे स्कील मुंबई-महाराष्ट्रात उपलब्ध नसेल, तर इतर राज्यातून काय परदेशातून का लोक मागवले तरी आक्षेप नाही. पण एका ठराविक शहरातच ही जाहिरात का याचं उत्तर सरकारने द्यावं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतले काही महत्त्वाचे मुद्दे

वेदांता – फॉक्सकॉनवरुन राज्य सरकारकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही, बल्कड्रग पार्कही राज्याचा बाहेर गेला, त्यावरही उत्तर नाही.

मुख्यमंत्री दिल्लीत स्वत:साठी गेले की महाराष्ट्रासाठी,शिंदेची दिल्लीवारी आठवी आहे आणि २ वाऱ्या लपून छपूनसह १२ वी वारी.

राज्यातील किती प्रकल्पांना खोके सरकारने स्थिगिती दिली? हे पाहणे हा देखील एक सवाल आहे. वर्सोवा ब्रांदा सी लिंक हे देखील काम बंद पाडले.

वर्सोवा ब्रांदा सी लिंक हे काम मुंबईत आणि मुलाखती चेन्नईत होत आहेत. वेदांताच्या अध्यक्षांना महाराष्ट्राला काहीतरी देऊ हे ट्ववीट करण्यासाठी दवाब आणला – वेदांता – फॉक्सकॉनवरुन राज्य सरकारकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.