अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक कोण जिंकणार; आदित्य ठाकरे म्हणतात आमची लढाई…

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर घणाघात केला आहे. तसेच आमचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक कोण जिंकणार; आदित्य ठाकरे म्हणतात आमची लढाई...
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 12:36 PM

मुंबई : ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना हाय कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.  हाय कोर्टाने गुरुवारी ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्विकारण्याचे आदेश महापालिकेला (BMC) दिले होते. त्यामुळे आता लटके यांचा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मार्ग मोकाळा झाला आहे. यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचाच विजय होईल असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी लटके यांच्या राजीनाम्यावरून पुन्हा एकदा शिंदे गटावर घणाघत केला आहे.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर घणाघात केला आहे. कालपर्यंत एका महिलेला त्रास दिला गेला. महापालिकेवर राजीनामा न घेण्यासाठी दबाव असल्याचं दिसून येत होतं. हे खोके सरकारचं घाणेरडं राजकारण आहे. आमची ही लढाई गद्दारीच्या वृत्तीविरोधात आहे.  आमच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा निश्चित विजय होईल अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दली आहे.

हे सुद्धा वाचा

बाळासाहेबांच्या शिवसेनेचा दावा काय?

दरम्यान दुसरीकडे बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून देखील अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत आमचाच उमेदवार विजयी होईल असा दावा केला जात आहे. यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आणि  बाळासाहेबांची शिवसेना युतीचा उमेदवार अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवणार आहे. त्याबाबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे घोषणा करतील. या निवडणुकीमध्ये आम्हीच बाजी मारू असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला आहे. दोन्ही गटाकडून विजयाचा दावा करण्यात येत असल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.