ठाकरे गटावर विश्वास; कल्याण मधील ‘या’ गावाला तब्बल 20 वर्षानंतर मिळाला पहिला सरपंच

कल्याण तालुक्यातील (Kalyan) वाहोली ग्रामपंचायतीला तब्बल वीस वर्षानंतर पहिला सरपंच मिळाला आहे.

ठाकरे गटावर विश्वास; कल्याण मधील 'या' गावाला तब्बल 20 वर्षानंतर मिळाला पहिला सरपंच
Follow us
| Updated on: Oct 17, 2022 | 5:36 PM

मुंबई : राज्यातील 1 हजार 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. मात्र, ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत एक अजब निकाल पहायला मिळाला आहे. कल्याण तालुक्यातील (Kalyan) वाहोली ग्रामपंचायतीला तब्बल वीस वर्षानंतर पहिला सरपंच मिळाला आहे. ठाकरे गटाचे शाहीम सरवले वाहोली ग्रामपंचायतीचे सरंपच झाले आहेत. येथील ग्रामस्थांनी ठाकरे गटावर विश्वास दाखवला आहे. यामुळे येथे वेगळाच जल्लोष पहायला मिळत आहे.

कल्याण तालुक्यातील वाहोली ग्रामपंचायत मागील वीस वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली खाली होती. मागील 20 वर्षांनंतर ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

मात्र, यंदा निवडणुकीवर बहिष्कार न टाकता ग्रामस्थांनी मतदानाचा निर्णय घेतला. ठाकरे गटाने शाहीम सरवले यांना सरपंच पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले. मात्र, वाहोली पाड्यातून कैलास रोहने यांनी थेट सरपंच पदासाठी अर्ज दाखल केल्याने येथे निवडणूक घेण्यात आली.

तब्बल वीस वर्षांनतर ग्रामस्थांनी मतदान केले. या निवडणुकीच ठाकरे गटाचे शाहीम सरवले सरपंच म्हणून निवडणून आले आहेत.

कल्याण तालुक्याचा निकाल

  1. वाहोली ग्रामपंचायत – ग्रामविकास पॅनल कडून शाहीम सरवले विजयी
  2. केळणी कोलम गट ग्रा. प. – भाजपचे राजेश भोईर विजयी
  3. मामनोली ग्रामपंचायत – भाजपचे सुशांत कोर
  4. दहिवली अडीवली ग्रामपंचायत – ठाकरे गटाकडून कमलाकर राऊत विजयी
  5. रुंदे ग्रामपंचायत – भाजप चे नरेश चौधरी
  6. फळेगाव ( बिनविरोध) – राष्ट्रवादी भारती जाधव
  7. उषीद बिनविरोध – शिवसेना ठाकरे गट सुवर्णा भोईर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि तालुक्यातील एकूण सात ग्रामपंचायतसाठी निवडणूक पार पडली.

यातील कल्याण तालुक्यातील फळेगाव आणि उशीद या दोन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे या दोन ग्रामपंचायत वगळून इतर पाच ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी झाली असून या ग्रामपंचायतीत भाजप 3, ठाकरे गट 2, राष्ट्रवादी 1,तर इतर 1 असा निकाल लागला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.