Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चित्रा वाघ यांच्यानंतर अजून एका भाजप नेत्याला धमकीचा फोन!

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्यालाही धमकीचे फोन आल्याची तक्रार केली आहे. समता नगर पोलिस चौकीत ही तक्रार केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

चित्रा वाघ यांच्यानंतर अजून एका भाजप नेत्याला धमकीचा फोन!
चित्रा वाघ, भाजप नेत्या
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 3:36 PM

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांना धमकीचे फोन आल्याची माहिती त्यानी स्वत: ट्विटरवर दिली होती. त्यानंतर आता भाजपच्या अजून एका मोठ्या नेत्याला धमकीचे फोन आल्याची माहिती मिळतेय. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्यालाही धमकीचे फोन आल्याची तक्रार केली आहे. समता नगर पोलिस चौकीत ही तक्रार केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अशा प्रकारच्या धमक्यांना आम्ही घाबरणारे नाही, असं आव्हानच भातखळकर यांनी धमकीचे फोन करणाऱ्यांना दिलं आहे.(BJP MLA Atul Bhatkhalkar also received threatening phone calls)

पूजा चव्हाण प्रकरणात भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात आल्यामुळे, या प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. त्यानंतर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ आणि आता अतुल भातखळकर यांनाही धमकीचे फोन आल्यामुळे हे प्रकरण कुठल्या थराला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

‘अशा धमक्यांना भिक घालत नाही’

पूजा चव्हाण प्रकरणात चित्रा वाघ यांनी वनमंत्री संजय राठोड यांचं थेट नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर त्यांना धमकीचा फोन आल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच “धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही. त्यामुळे उगाच मला फोनकरून वेळ वाया घालवू नका माझ्या भावड्यांनो”, असं प्रत्युत्तरही चित्रा वाघ यांनी ट्विटरवर दिलं आहे.

चित्रा वाघ यांच्यानंतर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनाही धमकीचे फोन आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. “पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे काल पासून धमक्यांचे फोन येतायत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे. धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे”, असा इशाराच भातखळकर यांनी ट्विटरवरुन दिलाय.

बघू शिवसेनेत कोण मर्द उरलाय? नितेश राणेंचं आव्हान

“पूजा चव्हाणबद्दल आवाज उचल्यावर आमच्या सहकाऱ्यांना धमकीचे फोन येत आहेत. एखादा कॉल मलाही टाका ना” असं खुलं आव्हान भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. “मला फोन येत नाही, याचं दुःख झालं आहे. मलाही फोन करा, मलाही बरं वाटेल. माझा नंबरही देतो, घ्या फोन करा. फोन आला तर बाकीच्या गोष्टींवर मीही बोलू शकतो ना. एका मुलीला न्याय देण्यासाठी आमचा पक्ष जबाबदारी म्हणून पुढे येत आहे. सरकार न्याय देत नाही” अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.

संबंधित बातम्या : 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप, चित्रा वाघांना धमकीचे फोन

पूजा चव्हाणबद्दल आवाज उचलल्याने मलाही कॉल करा, बघू शिवसेनेत कोण मर्द उरलाय : नितेश राणे

BJP MLA Atul Bhatkhalkar also received threatening phone calls

उद्या लोकलने प्रवास करताय? रविवारी 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
उद्या लोकलने प्रवास करताय? रविवारी 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.