मोदींना सतत खलनायक म्हणून मुकाबला अशक्य, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं मत

मोदींना खलनायक म्हटल्यामुळे त्यांची प्रतिमा अजून चांगली होती आणि विरोधाक त्यांची एकप्रकारे मदतच करत आहेत, असं सिंघवी (Abhishek Manu singhvi) यांनी म्हटलंय. मोदींचं महत्त्व नाकारुन आणि त्यांना प्रत्येक वेळी खलनायक म्हणून काहीही साध्य होणार नाही, असं जयराम रमेश (Jayram Ramesh) म्हणाले होते.

मोदींना सतत खलनायक म्हणून मुकाबला अशक्य, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं मत
Follow us
| Updated on: Aug 23, 2019 | 5:18 PM

नवी दिल्ली : एकापाठोपाठ एक काँग्रेसच्या दोन नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहमीच खलनायक ठरवणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jayram Ramesh) यांच्यानंतर सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील आणि काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Manu singhvi) यांनीही याबाबत मत व्यक्त केलंय. मोदींना खलनायक म्हटल्यामुळे त्यांची प्रतिमा अजून चांगली होती आणि विरोधाक त्यांची एकप्रकारे मदतच करत आहेत, असं सिंघवी (Abhishek Manu singhvi) यांनी म्हटलंय. मोदींचं महत्त्व नाकारुन आणि त्यांना प्रत्येक वेळी खलनायक म्हणून काहीही साध्य होणार नाही, असं जयराम रमेश (Jayram Ramesh) म्हणाले होते.

सिंघवी यांनी जयराम रमेश यांच्या वक्तव्याचा दाखला देत मत मांडलं. “मी नेहमीच सांगितलंय की मोदींना खलनायक सादर करणं चुकीचं आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून नव्हे, तर असं करुन विरोधक एक प्रकारे त्यांची मदतच करत आहेत. काम नेहमीच चांगलं, वाईट किंवा किरकोळ असतं. कामाचं मूल्यांकन व्यक्ती नव्हे, तर मुद्द्यांच्या आधारावर व्हायला हवं, जसं की उज्ज्वला योजना हे चांगल्या कांमांपैकी एक आहे,” असं ट्वीट सिंघवी यांनी केलं.

जयराम रमेश यांनीही बुधवारी याच पद्धतीचं मत मांडलं होतं. पंतप्रधान मोदी यांनी 2014 ते 2019 या काळात ज्या पद्धतीने काम केलंय, त्याचं महत्त्व ओळखण्याची गरज आहे. याचमुळे ते पुन्हा सत्तेत परतले आहेत. सरकारी मॉडल हे पूर्णपणे नकारात्मक नाही, असं मत जयराम रमेश यांनी व्यक्त केलं. त्यांनी राजकीय विश्लेषक कपिल सतीश कोमीरेड्डी यांच्या पुस्तक ‘मालेवॉलेंट रिपब्लिक: अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ द न्यू इंडिया’ चं प्रकाशन करताना हे मत मांडलं.

मोदी अशा भाषेत बोलतात, जी त्यांना लोकांशी जोडून ठेवते. मोदी अशी कामं करत आहेत, ज्यामुळे जनता त्यांचं कौतुक करत आहे आणि ही कामं यापूर्वी झालेली नाहीत, हे आपण जोपर्यंत मान्य करत नाही, तोपर्यंत मोदींचा सामना करणं अशक्य आहे, असं जयराम रमेश म्हणाले. सोबतच तुम्ही प्रत्येक वेळी त्यांना खलनायक म्हणत असाल तर त्यांचा सामना होऊ शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.