शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी भाजपच्या राम कदमांना ‘गोड’ बातमी दिली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला आहे. विधानसभेत आज (30 नोव्हेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला.

शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी भाजपच्या राम कदमांना 'गोड' बातमी दिली
Follow us
| Updated on: Nov 30, 2019 | 4:26 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला आहे. विधानसभेत आज (30 नोव्हेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. हा ठराव जिंकल्यामुळे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजप आमदार राम कदम (Pratap sarnaik and ram kadam meet) यांना पेढा भरवत गोड बातमी दिली.

विधानसभा निकालानंतर भाजपसोबतची युती तोडून शिवसेनेने थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत जाऊन सरकार स्थापन केले. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत मोठी दरी निर्माण झाली आहे. याच दरम्यान प्रताप सरनाईकांनी राम कदमांना (Pratap sarnaik and ram kadam meet) पेढा भरवत गोड बातमी दिल्याने त्यांच्या फोटोची चर्चाही सर्वत्र सुरु झाली आहे.

विधानसभेत आज महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकल्याने ठाकरे सरकार हे अग्निपरीक्षेत पास झाले आहे. महाविकासआघाडीच्या बाजून 169 सदस्यांची मतं पडली. त्यामुळे त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. यादरम्यान 4 सदस्य तटस्थ राहिले.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी हा विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला नवाब मलिक, सुनिल प्रभू, जयंत पाटील या तिन्ही नेत्यांनी अनुमोदन केले.

  • विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने – 169
  • विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात – शून्य
  • तटस्थ – 4
  • विश्वासदर्शक ठराव संमत
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.