CM of Maharashtra : शिंदेंची बंडखोरी शिवसेनेलाही मान्य? ‘सामना’ची हेडलाईन खूप काही बोलून गेली!

Saamana on Eknath Shinde : हेडलाईनचं शिर्षक 'शिंदेंच्या मंत्रिमंडळात फडणवीस उपमुख्यमंत्री' असं दिलं आहे.

CM of Maharashtra : शिंदेंची बंडखोरी शिवसेनेलाही मान्य? 'सामना'ची हेडलाईन खूप काही बोलून गेली!
एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करताना राज्यपाल...Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 7:04 AM

मुंबई : बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे (Eknath Shinde News) आता राज्याचे मुख्यमंत्री झालेत. अनपेक्षितपणे त्यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. या सगळ्यात मोठ्या राजकीय घडामोडीची शिवसेनेचं मुखयपत्र असलेल्या दैनिक सामनामधून (Daily Saamana) कशी दिली जाते, याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. दैनिक सामनानं या मोठ्या राजकीय उलथापालथींबाबत अत्यंत बोलकी अशी हेडलाईन दिली आहे. हा भाजप हायकमांडचा मास्ट्ररस्ट्रोक असल्याचं सामनानं म्हटलंय. तर हेडलाईनचं शिर्षक ‘शिंदेंच्या मंत्रिमंडळात फडणवीस उपमुख्यमंत्री’ असं दिलं आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे सामना दैनिकानं ‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले’ असा नामोल्लेख हेडलाईन देताना टाळल्याचं दिसून आलंय. त्यामुळे बंडखोर नेत्यांनी केलेल्या या कृत्यावर दिलेली ही बातमी अनेक बाबी आणि उद्धव ठाकरे यांची भूमिकाही अधोरेखित करते, असं जाणकारांचं मत आहे.

भाजप हायकमांडचा मास्टरस्ट्रोक… जबरदस्त ट्विस्ट या खाली शिंदेच्या मंत्रिमंडळात फडणवीस उपमुख्यमंत्री अशी हेडलाईन सामनातून दिली गेली. तसंच एकनाथ शिंदे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटोही शापण्यात आलाय. या बातमीत असं सांगण्यात आलं आहे की…

हे सुद्धा वाचा

महाविास आघाडी सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या आमदारांनी बंड पुकारल्याने निर्माण झालेल्या सत्तानाट्याच्या शेवटच्या अंकात भाजपच्या केंद्रातील नेतृत्त्वाने बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यात भाग पाडत मास्ट्रर स्ट्रोक मारला.

शिवसेनेलाही भाजपचा मास्टरस्ट्रोक मान्य!

रंगतदार राजकीय घडामोडींत अखेर सरकार आता स्थापन झाला. मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी शपथ घेतल. पण उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेण्याआधी नाट्यमय घडामोडी घडल्या. मी मंत्रिमंडळात नसेल, असं शिंदे यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आणि फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद घेण्यास सांगतलं. त्यानंतर अमित शाह यांचेही फडणवीसांच्या अभिनंदनाचं ट्वीट आलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दोनवेळी फोन केल्याची माहिती देण्यात आली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.