राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंकडूनही आता ‘लाव रे तो व्हिडीओ’

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ‘लाव रे तो व्हिडीओ’ची सुरुवात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी वीर सावरकरांबद्दल जे वक्तव्य केलं होतं, ते वक्तव्य उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सभेत दाखवलं. शिवाय मी लाव रे तो व्हिडीओ म्हणणार नाही, असंही म्हणायला […]

राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंकडूनही आता 'लाव रे तो व्हिडीओ'
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ‘लाव रे तो व्हिडीओ’ची सुरुवात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी वीर सावरकरांबद्दल जे वक्तव्य केलं होतं, ते वक्तव्य उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सभेत दाखवलं. शिवाय मी लाव रे तो व्हिडीओ म्हणणार नाही, असंही म्हणायला ते विसरले नाही.

उद्धव ठाकरेंनी नाशिकचे युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी या सभेसाठी उपस्थित होते. ज्याला खुमखुमी असेल त्याने 29 तारखेला टक्कर देऊनच दाखवावी, असं आव्हान त्यांनी दिलं. शिवाय आपल्याकडे हेमंत आप्पा, समोर नुसत्या गप्पा, असं म्हणत त्यानी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.

काहीजण मफलर मधून गळा फाडताय.. तुमचा काही दोष नाही मग जेलमध्ये का गेलात? तुम्ही शिवसेना प्रमुखांना अटक करायला निघाले होते.  शिवसेना प्रमुख स्वतः कोर्टात हजर झाले. शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसैनिकांनी मुंबई वाचवली हा गुन्हा होता का? आज जामिनावर आहेत, उद्या पुन्हा आत जाणार. ते काय आणि त्यांचे पुतणे काय.. 50 वर्ष बकासुरासारखं खाल्लं आणि आम्हाला विचारताय लाज नाही का वाटत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी भुजबळांवर केला.

राज्यात सध्या सभांचा धडाका सुरु आहे. अखेरच्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी मुंबईतील सहा जागांसह एकूण 17 जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या 17 जागांचा समावेश आहे.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.