Politics : शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीलाही गळती?, दोन आजी-माजी आमदार फडणवीसांच्या भेटीला; चर्चा तर होणारच!

गेल्या अनेक दिवसांपासून राजन पाटील हे भाजपात प्रवेश करणार याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगलेली होती. सत्तांतरानंतर चर्चा अधिक जोर धरु लागल्याने पाटील हे भाजपात सहभागी होणारच असेच वातावरण निर्माण झाले होते. असे असतानाच बबनदादा शिंदे आणि त्यांनी थेट उपमुख्यमंत्री यांची भेट घेतल्याने आता भाजपात प्रवेश करुन या चर्चांना ते पूर्णविराम देणार का हे पहावे लागणार आहे.

Politics : शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीलाही गळती?, दोन आजी-माजी आमदार फडणवीसांच्या भेटीला; चर्चा तर होणारच!
राजन पाटील आणि आ. बबनदादा शिंदे
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 1:25 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून (Maharashtra Politics) राज्याचे राजकारण हे केवळ (Shiv Sena) शिवसेना, शिंदे गट आणि भाजप पक्षापर्यंतच मर्यादित होते. पण आता नवा ट्विस्ट यामध्ये आला आहे. शिवसेनेतून शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसाकाठी वाढत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते हे भाजपाच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ आता (Rashtrawadi Congress) राष्ट्रवादीलाही गळती लागणार हे पहावे लागणार आहे. कारण माढ्याचे आ. बबनदादा शिंदे आणि मोहळचे माजी आमदार राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजन पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत्या पण आता भेट घेतल्यानंतर प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार का हे पहावे लागणार आहे. राजन पाटील हे माजी आमदार तर बबनदादा शिंदे हे माढा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांच्या या भूमिकेनंतर सोलापूरच्या राजकारणाचे चित्र काय समोर येणार हे पहावे लागणार आहे.

दिल्लीत भेटीगाठीचे सत्र सुरु

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीवारीवर आहेत. या दरम्यानच्या काळातच महाराष्ट्र सदनामध्ये राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठीता सिलसिला सुरु झाला आहे. शपथविधी सोहळा पार पडताच जालन्याचे अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. असे असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदार संघाचे आ. बबनदादा शिंदे आणि माजी आ. राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे हे दोन राष्ट्रवादीचे नेते आता भाजपात प्रवेश करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

चर्चेला मिळणार का पूर्णविराम ?

गेल्या अनेक दिवसांपासून राजन पाटील हे भाजपात प्रवेश करणार याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगलेली होती. सत्तांतरानंतर चर्चा अधिक जोर धरु लागल्याने पाटील हे भाजपात सहभागी होणारच असेच वातावरण निर्माण झाले होते. असे असतानाच बबनदादा शिंदे आणि त्यांनी थेट उपमुख्यमंत्री यांची भेट घेतल्याने आता भाजपात प्रवेश करुन या चर्चांना ते पूर्णविराम देणार का हे पहावे लागणार आहे. मात्र, कोणत्या मुद्द्यावर नेमकी चर्चा झाली हे स्पष्ट झालेले नाही.

स्थानिक पातळीवर महत्व

बबन शिंदे यांचे माढा मतदार संघात तर राजन पाटील यांचे मोहोळ मतदार संघात राजकीय वजन आहे. शिवाय हे दोन्ही नेते राष्ट्रवादीचे असून गेल्या काही दिवसांमध्ये यांच्यात नाराजी आहेत. त्यामुळे ते भाजपात प्रवेश करणार याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. आता थेट दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांचीच त्यांनी भेट घेतल्याने बंद दरवाज्यात काय चर्चा झाली ते पहावे लागणार आहे.

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....