सुषमा अंधारे यांच्यामुळे दिपाली सय्यद ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाणार?

राजकारणात कोण कधी, कुठं जाईल सांगता येत नाही. मी अंतर्गत स्पर्धक नाही तर स्वत:ला सिद्ध करतेय असं सुषमा अंधारे म्हणतायत.

सुषमा अंधारे यांच्यामुळे दिपाली सय्यद ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाणार?
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 11:13 PM

मुंबई : सुषमा अंधारे अधिक सक्रिय झाल्यामुळं, दिपाली सय्यद ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मी शिवसेनेत नवीन आहे. त्यामुळं स्वत:ला सिद्ध करतेय असं सुषमा अंधारेंचं म्हणण आहे. मनसेच्या शालिनी ठाकरेंनीही अंधारेंवरुन पेडणेकर आणि मनिषा कायंदेंना ट्विटरवरुन चिमटा काढला. यावरुनच सय्यद ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाली आहे.

अंधारात तीर मारणाऱ्या नवं शिवसैनिकांमुळे माजी महापौर व कांदे बाई यांचे वांदे झाल्याची चर्चा शिल्लक सेनेत सुरू आहे. महाप्रबोधन यात्रेत बोलावले नाही म्हणून त्यांनी प्रमुखांकडे तक्रार करुनही उपयोग झाला नाही. मूळ सैनिक यांच्यावर अन्याय करुन उपऱ्याना संधी ही नवीन शिल्लक सेना, अजब आहे

2019च्या विधानसभा निवडणुकीआधी दिपाली सय्यद शिवसेनेत आल्या होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना मुंब्र्यातून जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. पण आता त्या शिंदे गटात जाणार की काय ? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

विशेष म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी आधी ठाकरे आणि शिंदेंना एकत्र आणण्याचाही प्रयत्न केला. नंतर शिंदेंची भेट घेऊन त्यांच्याच कामाचं कौतुकही केलं.

तर, शिवसेनेत फूट पडल्यानंतरच, सुषमा अंधारेंची एंट्री झाली आणि सध्या त्या ठाकरे गटासह भाजपवर अक्षरश: तुटून पडतायत. ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेतही अंधारेच दिसत आहेत.

राजकारणात कोण कधी, कुठं जाईल सांगता येत नाही. मी अंतर्गत स्पर्धक नाही तर स्वत:ला सिद्ध करतेय असं सुषमा अंधारे म्हणतायत. आता दिपाली सय्यद काय करतात तेही दिसेलच.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.