प्रियंका गांधींच्या ट्वीटनंतर चंद्रकांतदादा आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली!
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भगवा दहशतवादाची आठवण करुन देत प्रियंका गांधी यांना टोला लगावला. तसंच राम मंदिराच्या मुद्द्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रश्न विचारला.
मुंबई : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी वसंत पंचमीनिमित्त एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी माजी पंतप्रधान आणि त्यांच्या आजी इंदिरा गांधींची एक आठवण सांगितली आहे. त्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भगवा दहशतवादाची आठवण करुन देत प्रियंका गांधी यांना टोला लगावला. तसंच राम मंदिराच्या मुद्द्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रश्न विचारला. त्यावर आता पटोले यांनीही चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर दिलं आहे.(Chandrakant Patil and Nana Patole’s Twitter war)
प्रियंका गांधी यांचं ट्वीट काय?
“वसंत पंचमी निमित्त आमजी आजी इंदिराजी शाळेत जाण्यापूर्वी आम्हा दोघांच्या खिशात पिवळा रुमाल टाकत असत. आजही त्यांची परंपरा जपत माझी आई सरसोंचे फुल मागवून घरात वसंत पंचमी साजरी करते. विद्येची देवी सरस्वती सर्वांचं कल्याण करो. तुम्हा सर्वांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा”, असं ट्वीट प्रियंका गांधी यांनी केलं आहे.
बसंत पंचमी के अवसर पर मेरी दादी इंदिरा जी स्कूल जाने से पहले हम दोनों की जेब में पीला रूमाल डाल देती थीं। आज भी उनकी परम्परा निभाते हुए मेरी माँ सरसों के फूल मंगाकर घर में बसंत पंचमी के दिन सजाती हैं।
ज्ञान की देवी माँ सरस्वती सबका कल्याण करें। आप सबको बसंत पंचमी की शुभकामनाएँ
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) February 16, 2021
प्रियंका गांधींना टोला, पटोलेंना सवाल
प्रियंका गांधी यांच्या ट्वीटला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, ‘अरे देशानं हे काय पाहिलं? ही तिच काँग्रेस आहे, जी भगव्या दहशतवादाच्या गोष्टी करत होती. जिने प्रभू श्रीरामाला काल्पनिक सांगत मंदिर निर्माणाविरोधात आपल्या वकिलांची फौज उतरवली होती? तसं पाहिलं तरी ही निवडणुकीपुरतं हिंदुत्व असणारी काँग्रेस आहे’. हे ट्वीट करताना चंद्रकांतदादांनी नाना पटोले यांचा उल्लेख करत खोचक प्रश्न विचारला आहे.
अरे ये क्या देख लिया देश ने?!! ये वही @INCIndia है क्या, जो भगवा आतंकवाद की बात करती थी? जिसने प्रभु श्रीराम को काल्पनिक बताकर मंदिर निर्माण के खिलाफ अपने वकीलों की फौज उतारी थी? वैसे देश तो जानता है कि ये ‘चुनावी हिन्दू’ वाली कांग्रेस है… क्यों @Nana_Patole जी ? https://t.co/apnnX4TLa2
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 16, 2021
नाना पटोलेंचं प्रत्युत्तर
राम मंदिराचं कुलुप तोडणारे श्रीमती प्रियंका गांधी यांचे वडील माजी पंतप्रधान राजीव गांधी होते. हिंदू धर्म रक्तात भिनला आहे. त्याला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. राम मंदिराच्या नावाने पैसा गोळा करणाऱ्यांनो, काही वर्षांपूर्वीही तुम्ही राम मंदिराच्या नावाने पैसा गोळा केला होता. त्याचं काय केलं सांगा? असा प्रतिप्रश्न नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला आहे.
राम मंदिर का ताला तोडणे वाले श्रीमती @priyankagandhi जी के पिता स्व. राजीव गांधी जी थे! हिंदु धर्म नस नस मे भरा हुआ है किसी को सर्टिफिकेट देणे की जरुरत नही है! राम मंदिर के नाम से पैसा जमा करने वालो कुछ साल पहले भी श्रीराम जी के नाम चंदा मांगा था उसका क्या किया यही बता दो. https://t.co/AiNpH0KbU6
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 16, 2021
इतर बातम्या :
एका महिलेच्या सुरक्षित मतदारसंघातून जिंकणं, यात काय पुरुषार्थ? जयंत पाटलांचा चंद्रकांतदादांना टोला
Chandrakant Patil and Nana Patole’s Twitter war