बिकिनी असो की घुंगट! अल्लाहू अकबर म्हणणाऱ्या मुलीच्या समर्थनात प्रियंका गांधींचं ट्विट, ट्विटरवर #Bikiniचा पूर
Why #Bikini is in trend on Twitter : अनेकांनी प्रियंका गांधीच्या ट्विटवर भरभरुन प्रतिक्रिया दिल्यात. #ladkihoonladsaktihoon अर्थात मी मुलींसोबत आहे, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं. पण त्यांनी केलेल्या हॅशटॅगऐवजी भलताच टॅग ट्रेन्ड होऊ लागलाय.
नवी दिल्ली : बिकिनी असो की घुंगट, जीन्स असो की हिजाब, काय परिधान करायचं, हे ठरण्याचा अधिकार स्त्रीला आहे. संविधानानं दिलेला हा ‘गॅरंटीड’ अधिकार आहे. त्यामुळे महिलांचं शोषण करणं थांबवा, असं ट्वीटर प्रियंका गांधी वाड्रा (Tweet of Priyanka Gandhi Vadra) यांनी केला आहे. आज सकाळी त्यांनी याबाबत ट्वीट केलाय. कर्नाटकातील हिजाब विरुद्ध भगवा (Hijab vs Saffron) असा वाद पेटलाय. त्याचा व्हिडीओही मंगळवारी तुफान व्हायरल झाला होता. मुस्कान खान या हिजाब परिधान केलेल्या एका विद्यार्थीनीली हिजाबविरोधी भूमिका घेणाऱ्या तरुणांनी घेराव घातला होता. कॉलेजात प्रवेश करताना झालेला हा सगळा राडा मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर आता प्रियंका गांधी यांनीही याबाबात ट्वीट करत मुलींच्या सुरु असलेल्या शोषणावरुन आवाज उठवला आहे. दरम्यान, प्रियंका गांधी यांच्या या ट्वीटनंतर आता ट्विटरवर बिकिनी (#Bikini) हा हॅशटॅग ट्रेन्ड होऊ लागला आहे.
प्रियंकांचं ट्वीट, ट्विटरवर बिकिनी हिट
अनेकांनी प्रियंका गांधीच्या ट्विटवर भरभरुन प्रतिक्रिया दिल्यात. #ladkihoonladsaktihoon अर्थात मी मुलींसोबत आहे, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं. पण त्यांनी केलेल्या हॅशटॅगऐवजी भलताच टॅग ट्रेन्ड होऊ लागलाय. अचानक ट्विटरवर बिकनी या शब्दावरुन असंख्य ट्विट्स पडले असून बिकिनी ट्विट्सचा पूर ट्विटरवर पाहायला मिळतोय.
Whether it is a bikini, a ghoonghat, a pair of jeans or a hijab, it is a woman’s right to decide what she wants to wear.
This right is GUARANTEED by the Indian constitution. Stop harassing women. #ladkihoonladsaktihoon
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) February 9, 2022
अवघ्या तीन तासांत तब्बल 10 हजारच्या जवळपास लोकांनी प्रियंका गांधी वाड्रा यांचं हे ट्विट रिट्विट केलं आहे. तर 3 हजारपेक्षा जास्त लोकांनी या ट्वीटवर प्रतिक्रिया दिल्यात. तब्बल 33 हजार 500 जणांनी तीन तासांतच हे ट्विट लाईक केलं असून आता ट्विटरवर हिजाब विरुद्ध भगवा संघर्षात बिकिनी ट्रेन्ड होतोना पाहायला मिळतेय.
#BIKINIचा ट्रेन्ड जोरात!
काही युजर्सनी तर प्रियंका गांधी यांची खिल्ली उडवत त्यांनी बिकिनी स्कूल सुरु करायला हवेत, असा टोला ट्विटरवरुन लगावला आहे. बिकिनीसोबत प्रियंका गांधी यांनी तुलना केल्यामुळे काही जण संतपालेत. बिकिनीसोबत हिजाबची तुलना केल्यावरुन काँग्रेसनं काहीही होऊ शकत नाही, असंही एका युजरनं म्हटलंय.
कांग्रेस यूनिवर्सिटी पढ़ने जाती एक छात्रा??❤ https://t.co/dQ5KWJYksJ pic.twitter.com/6onYji9DkX
— ?ʀ.?sʜɪsʜ (@_iAmDrAshish) February 9, 2022
2022 मध्ये काय होतंय? पुढे काय होणार?
This. pic.twitter.com/95OpQrPEmh
— ArJuN (@ArJuNrAo2000) February 9, 2022
प्रियंका गांधीच्या ट्वीटनंतर युजर्सनी तोडले अकलेचे तारे!
Indian Schools be like if #PriyankaGandhi ever becomes PM of India. ??? Bikini pic.twitter.com/XqR61cqI33
— देशी छोरा (@Deshi_Indian01) February 9, 2022
तनिशा बत्रा नावाच्या एका युजरचा प्रियंका गांधींवर निशाणा
The India we live in vs the India congress wants
This stupid Bikini tweet by Priyanka Baaji is #shameful pic.twitter.com/LlFlEwBAAL
— Tanisha Batra (@TanishaBatra80) February 9, 2022
प्रियंका गांधी यांनी ट्वीट केल्यानंतर अवघ्या काही तासांत हजारोंच्या संख्येनं लोकांनी बिकनी विरुद्ध हिजाब असा नवा वाद आता सुरु केला आहे. काँग्रेसवर प्रियंका गांधीच्या ट्वीटवरुन टीकाही केली जाते आहे. एकूणच हा वाद आता चांगलाच चर्चेत येण्याची शक्यता आहे.
वादाचं मूळ काय?
जानेवारीत उडुपीच्या एका सरकारी महाविद्यालयात सहा विद्यार्थीनींना हिजाब घालून महाविद्यालयात येण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र, महाविद्यालयाने परवानगी दिली नाही असं सांगितलं गेलं. त्यानंतर हा ट्रेंड निघून गेला. तसेच दुसऱ्या महाविद्यालयातही विद्यार्थीनी हिजाब घालून जाऊ लागल्या. त्याला विरोध म्हणून काही विद्यार्थीनींनी भगवा स्कार्फ घालून महाविद्यालयात जायला सुरवात केली. त्यानंतर त्याला राजकीय वळण मिळालं आणि वादाला सुरुवात झाली.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातमी :
Karnataka Hijab| शैक्षणिक संस्थेत तिरंग्याच्या जागी भगवा फडकवला, जय श्रीरामचा नारा, कलम 144 लागू!
Video | ‘अल्ला हूँ अकबर’ची घोषणा देणाऱ्या मुस्कानला दिले 5 लाख! कुणी दिलं बक्षिस?