जो बाण सांभाळू शकला नाही तो शेतकऱ्यांचं बांध काय सांभाळणार? कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची ठाकरेंवर टीका
शेतकऱ्यांनी जमिनीत स्वत:ला गाडून घेत सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. गेल्या 4 दिवसांपासून कैलास पाटलांचं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपोषण सुरु आहे.
मुंबई : उद्धव ठाकरेंनंतर आदित्य ठाकरेंही शेतकऱ्यांच्या बांधावर आलेत. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरेही नाशिक आणि पुणे जिल्ह्यात आले. आणि ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी करत, शिंदे सरकारवरगद्दारीची टीका केलीच. दिवसांआधीच उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली होती. आता आदित्य ठाकरेंनीही, पाहणी दौरा सुरु करत शेतकऱ्यांचं म्हणणंय ऐकून घेत आहेत. इकडे नुकसान ग्रस्त पाहणी दौऱ्यांवरुन, आदित्य ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आलाय. जो बाण सांभाळू शकला नाही शेतकऱ्यांचं बांध काय सांभाळणार ? अशी टीका कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी केली आहे.
इकडे उस्मानाबादच्या सारोळा गावात पिक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे मिळावे यासाठी आमदार कैलास पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन झाले.
यावेळी शेतकऱ्यांनी जमिनीत स्वत:ला गाडून घेत सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. गेल्या 4 दिवसांपासून कैलास पाटलांचं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपोषण सुरु आहे.
शेतकऱ्यांचं नुकसान मोठं आहे. त्यामुळं तात्काळ पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण करुन शेतकऱ्याला सावरण्याची गरज आहे.