“ठाकरे नावावरुन विश्वास उडेल…” नांदगावकरांच्या ट्विटला शिवसेनेच्या ‘दादा’ नेत्याचे उत्तर
एक ते दीड महिन्याच्या कालावधीत कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी 6 वेळा बैठका घेतल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.
मालेगाव : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत मनसेने मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल चढवल्यानंतर कृषीमंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिलं आहे. दीड महिन्यात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात सहा वेळा बैठका घेतल्याची माहिती भुसेंनी दिली. “मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल “online” बघता येणार नाही” असे ट्विट मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले होते. त्यावर कृषिमंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली. (Agriculture Minister Dadaji Bhuse answers MNS leader Bala Nandgaonkar tweet)
“माझ्यासारखे कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी घटना घडत आहेत, त्या-त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. पाहणी करुन त्याचं रिपोर्टिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करत आहोत. दर आठवड्यात कॅबिनेट बैठकीत यावर चर्चा होतेच. मला संबंधितांना सांगायचे आहे की एक ते दीड महिन्याच्या कालावधीत कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी 6 वेळा बैठका घेतल्या आहेत. त्याचं प्रारुप तयार करुन लवकरच त्यावर अंमलबजावणी होणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.
“मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल “online” बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा “ठाकरे” नावावरील विश्वास उडेल” असा टोला बाळा नांदगावकरांनी मुख्यमंत्र्यांना लगावला होता. औरंगाबादमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’ने शेतकऱ्यांशी संवाद साधल्याचा एक व्हिडीओ रिट्विट करत ही प्रतिक्रिया दिली होती.
@CMOMaharashtra ,@mnsadhikrut ,@abpmajhatv ,@News18lokmat ,@zee24taasnews ,@TV9Marathi pic.twitter.com/kAdGk35vST
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) October 15, 2020
मराठवाड्यात यंदा नेहमीच्या सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस कोसळला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांना व्यवस्थित पीक घेता आले नव्हते. यानंतरही शेतकऱ्यांनी उमेद न हारता दुबार-तिबार पेरणी गेली होती. पिकांनी तग धरल्यामुळे या मेहनतीचे चीजही होताना दिसत होते. मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची ही सर्व मेहनत पाण्यात घालवली आहे.
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्रीजी घर सोडा, अन्यथा लोकांचा “ठाकरे” नावावरील विश्वास उडेल, बाळा नांदगावकरांचं टीकास्त्र
(Agriculture Minister Dadaji Bhuse answers MNS leader Bala Nandgaonkar tweet)