अहेरी विधान सभा : बाप आणि लेक एकमेकांविरोधात लढणार, कोणाची हार कोणाची जित ?

गडचिरोली जिल्हा म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस असे समीकरम झाले होते. परंतू धर्मरावाबाबा आत्राम यांनी शरद पवार गटातून अजित पवार गटात प्रवेश केल्याने या मतदार संघातील गणित बदलले आहे.

अहेरी विधान सभा : बाप आणि लेक एकमेकांविरोधात लढणार, कोणाची हार कोणाची जित ?
Dharmarao Baba Atram and daughter Bhagyashree against each other
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 9:50 PM

महाराष्ट्रात लोकसभेत नणंद भावजय यांच्यात सामना पाहायला मिळाला होता. राजकारणात कधी काका विरोधात पुतण्या, भावाविरोधात भाऊ, मुला विरोधात बापाची लढत अशा अनेक लढती पाहील्या असतील. परंतू आता मुली विरोधात बाप असा संघर्ष विदर्भातील अहेरी मतदार संघात होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार गटात गेलेले आणि मंत्री झालेले धर्मरावबाबा आत्राम आणि शरद पवार गटातील त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांच्यात प्रथमच बाप आणि लेकीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

अहेरी विधानसभा मतदार संघ गडचिरोली जिल्ह्यात मोडत असून हा मतदार संघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघाचील सहा मतदार संघापैकी एक आहे. अहेरी शहर प्राणहिता नदीच्या काठावर आहे. साल 2011 च्या जनगणने नुसार अहेरी विधानसभा मतदार संघाची लोकसंख्या 2 लाख 15 हजार 360 इतकी आहे.  हा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. या मतदार संघाचे राजकीय दृष्ट्या खूप महत्व आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने या दोन्हींनी याकडे लक्ष केंद्रीत केलेले आहे. गडचिरोलीत राष्ट्रवादी पक्ष म्हणजे धर्मरावबाबा आत्राम असे समीकरण होते. मात्र धर्मरावबाबा आत्राम यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील समीकरण बदलेले आहे. या मतदार संघात आता धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांच्या सामना होणार आहे.

अहेरी विधानसभा मतदार संघात कॉंग्रेस आणि अपक्ष आमदाराचे वर्चस्व राहीलेले आहे. या मतदार संघात अहेरी, भामरागड, इटापल्ली, मुलचेरा आणि सरोंचा गावांचा समावेश होतो. या मतदार संघाची निर्मिती 1952 साली झाली होती. कॉंग्रेसचे नामदेवराव पोरेड्डीवार येथे पहिले आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 1957 आणि 1962 मध्ये अपक्ष म्हणून राजे विश्वेश्वरराव यांचा तर 1967 मध्ये अपक्ष उमेदवार जे.वाय. साखरे यांचा विजय झाला होता.

विधानसभा 2014 चा निकाल

उमेदवाराचे नावपक्षएकूण मतेटक्केवारी शेअर
अंबरीषराव राजे सत्यवनराव आत्रमभाजपा56,41837.3%
अत्रम धर्मरावबाबा राष्ट्रवादी कॉंग्रेस36,56024.17%
अत्रम दीपकदादाअपक्ष33,55522.19%

भाजपाचा पहिला विजय

साल 1972 मध्ये हा मतदारसंघात कॉंग्रेसचे मुकूंदराव अलोने निवडून आले. 1980 ते 1990 मध्ये कॉंग्रेस आणि अपक्ष आलटून पालटून येथे निवडून आले. 1995 ला नागविदर्भ आंदोलन समितीचे सत्यवानराव आत्राम निवडून आले.तर 1999 मध्ये गोंडवाना गणतंत्र पक्षाचे धर्मरावबाबा आत्राम विजयी झाले. आत्राम यांनी पुढे राष्ट्रवादीत प्रवेश केला. 2004 मध्ये राष्ट्रवादीतून ते आमदार झाले.त्यानंतर 2009 ला अपक्षाच्या ताब्यात गेला. त्यानंतर 2014 मध्ये या मतदार संघात भाजपाचा आमदार म्हणून अंबरिशराव आत्राम पहिल्यांदा निवडून आले. परंतू राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम 2019 ला पुन्हा आमदार झाले.

विधानसभा 2019 चा निकाल

उमेदवाराचे नावपक्षएकूण मतेटक्केवारी शेअर
आत्राम धर्मरावबाबा भगवंतरावराष्ट्रवादी कॉंग्रेस60,01336.07%
आत्रम अंबरीषराव राजे सत्यवनरावभाजपा44,55526.78%
आत्रम दीपक दादाकाँग्रेस43,02225.86%

 बाप-लेक-पुतण्या तिहेरी लढत ?

धर्मरावबाबांच्या कन्या भाग्यश्री यांनी बंड केले असून तिला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने तिकीट दिले आहे. शरद पवार यांची शिवस्वराज्य यात्रा अहेरीत आली तेव्हा तिने शरद पवार गटात प्रवेश केला होता. धर्मरावबाबा यांनी शरद पवार माझं घर फोडून मुलीला माझ्याविरोधात उभे करीत आहेत असा आरोप केला होता. अजितदादांनी देखील भाग्यश्रीला बापासोबतच राहा अशी साद घातली होती. आपल्यावर गैर आदिवासी असा आरोप केला जात आहे. जेव्हा मला जिल्हा परिषदेत घेतले तेल्हा जात नाही दिसली ? असा सवाल भाग्यश्री यांनी केला. तसेच अजित पवार यांना तुम्ही वेगळे काय केले. उलट तुम्हीत आता शरद पवारांकडे परत या असा उलट सवाल त्यांनी केला होता. या मतदार संघात आता अंबरीशराव आत्राम देखील महायुतीत तिकीट मिळालं नाही, तरी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारी करीत आहेत, म्हणजे बाप-लेक-पुतण्या अशी लढत होण्याची शक्यता आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.