श्रीपाद छिंदमच्या भावाला अटक
अहमदनगर : वादग्रस्त माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमचा भाऊ श्रीकांत छिंदम याला अटक करण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी श्रीकांत छिंदम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. श्रीकांत छिंदमने काल मतदानापूर्वी मतदान केंद्रावर जाऊन ईव्हीएमची पूजा केली होती. याच प्रकरणी श्रीकांतसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अहमदनगर महानगरपालिकेसाठी काल मतदान पार पडले. […]
अहमदनगर : वादग्रस्त माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमचा भाऊ श्रीकांत छिंदम याला अटक करण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी श्रीकांत छिंदम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. श्रीकांत छिंदमने काल मतदानापूर्वी मतदान केंद्रावर जाऊन ईव्हीएमची पूजा केली होती. याच प्रकरणी श्रीकांतसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अहमदनगर महानगरपालिकेसाठी काल मतदान पार पडले. श्रीपाद छिंदम आणि त्याची पत्नी अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छिंदम प्रभाग क्रमांक 9 मधून तर पत्नी 13 मधून निवडणूक लढत आहेत. ते दोघेही निवडून यावे यासाठी काल सकाळी मतदान सुरु होण्याआधी श्रीकांतने मतदान केंद्रावर जाऊन ब्राह्मणाच्या हातून ईव्हीएमची पूजा केली होती. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी श्रीकांत छिंदम विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
श्रीकांत छिंदमला ईव्हीएमची पूजा करु देण्यासंबंधी जबाबदार अधिकाऱ्यांना त्वरीत निलंबित करणार असल्याचे निवडणूक अधिकारी यांनी सांगितले होते.
छिंदम याच्यासाठी वाद काही नवा नाही. काही महिन्यांपूर्वी महापालिकेतील बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याशी कामासंदर्भात फोनवरुन बोलताना, छिंदमने शिवराय आणि शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. ज्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच छिंदमला अहमदनगर जिल्ह्यातून तडीपारही करण्यात आले होते.
अहमदनगर पालिकेसाठी एकूण 68 जागांसाठी निवडणूक झाली. निवडणुकीसाठी 17 प्रभागांतील प्रत्येकी 4 याप्रमाणे 68 जागांसाठी 339 उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांची संख्या 2 लाख 56 हजार 719 आहे. तर आज या निवडणुकीचे निकाल येणार आहेत.