दोन बायका केलेल्यांना बुटानेच मारलं पाहिजे, अब्दुल सत्तारांचा निशाणा कुणावर?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे लोकल गाडी, हात दाखवा गाडी थांबवा...अशी स्थिती आहे. ते सामान्यांचे आहेत. त्यामुळेच लोकप्रिय आहेत.. सत्तार यांचं हे वक्तव्यही सध्या चांगलंच चर्चेत आहे.
अहमदनगरः दोन बायका केलेल्यांना बुटानेच मारलं पाहिजे, अशी टीका कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केली. अहमदनगरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. आज आमदार वाणी असते तर गद्दारांना त्यांनी बुटानेच मारलं असतं असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेत अंबादास दानवे (Ambadas danve) यांनी केलं. त्याला प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी हे विधान केलं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची स्तुती करताना त्यांनी भन्नाटच वक्तव्य केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे लोकल गाडी, हात दाखवा गाडी थांबवा…अशी स्थिती आहे. ते सामान्यांचे आहेत. त्यामुळेच लोकप्रिय आहेत.. सत्तार यांचं हे वक्तव्यही सध्या चांगलंच चर्चेत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३६ वा पदवीदान समारंभ पार पडला. या समारंभाला राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर अब्दुल सत्तार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नाशिकमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावरून प्रतिक्रिया देताना अब्दुल सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. अनेक पक्षातील लोक कामावर खुश आहेत.. गतीमान सरकार चालवत आहेत.. जनतेचा मुख्यमंत्री म्हणून सहज उपलब्ध होणारे अशी त्यांची ओळख आहे.
अंबादास दानवेंवर टीका करताना अब्दुल सत्तार म्हणाले, ज्यांनी ज्यांनी दोन बायका केल्या त्यांना बुटानेच मारलं पाहिजे… त्यांना दोन बायका करण्याचा धर्माने अधिकार दिलाय का..? जर अधिकार असेल तर मारू नका .. नसेल तर त्यांना जरूर मारा…