नगरमध्ये वादग्रस्त श्रीपाद छिंदमचा तब्बल 1970 मतांनी विजय
अहमदनगर : विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या अहमदनगर महापालिकेत अखेर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी 18, तिसऱ्या क्रमांकावर भाजप 14 आणि काँग्रेस 5 चौथ्या क्रमांकावर फेकली आहे. सत्तेसाठी आता काय राजकीय समीकरणं जुळतात याकडे लक्ष लागलंय. या निवडणुकीत सर्वात आश्चर्यकारक निकाल म्हणजे वादग्रस्त उमेदवार […]
अहमदनगर : विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या अहमदनगर महापालिकेत अखेर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी 18, तिसऱ्या क्रमांकावर भाजप 14 आणि काँग्रेस 5 चौथ्या क्रमांकावर फेकली आहे. सत्तेसाठी आता काय राजकीय समीकरणं जुळतात याकडे लक्ष लागलंय. या निवडणुकीत सर्वात आश्चर्यकारक निकाल म्हणजे वादग्रस्त उमेदवार श्रीपाद छिंदमचा लागलाय.
शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळल्यामुळे सध्या तडीपारीची कारवाई भोगत असलेला श्रीपाद छिंदम प्रभाग क्रमांक नऊमधून तब्बल 1970 मतांनी निवडून आलाय. छिंदमला एकूण 4532 मतं मिळाली. तर त्याच्या विरोधातील भाजपचे उमेदवार प्रदिप परदेशी यांना 2562 मतं मिळाली. आपला विजय निश्चित असल्याचा दावा श्रीपाद छिंदमने मतदान केल्यानंतर केला होता.
कुणाला संपवायचं ते मतदारांच्या हातात असतं, मतदार हा राजा असून माझा विजय निश्चित आहे, असं श्रीपाद छिंदमने काल म्हटलं होतं. त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली असली तरी त्याला मतदानाची परवानगी देण्यात आली होती.
श्रीपाद छिंदमच्या भावाला अटक
श्रीपाद छिंदमचा भाऊ श्रीकांत छिंदमने काल मतदानापूर्वी मतदान केंद्रावर जाऊन ईव्हीएमची पूजा केली होती. याच प्रकरणी श्रीकांतसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.