अहमदनगर आयटी पार्क; आमदार संग्राम जगतापांवर गंभीर आरोप, तर काँग्रेस नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा!

किरण काळे यांनी जगताप यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसंच आयटी पार्कची पाहणी करुन त्याचा भांडाफोड केवल्यानं आमदार महोदरांनी आमच्यावर एका महिलेला पुढं करुन खोटा गुन्हा दाखल केल्याचंही काळे यांनी म्हटलंय. तर काळे हे अदखलपात्र असल्याचा टोला जगताप यांनी लगावलाय.

अहमदनगर आयटी पार्क; आमदार संग्राम जगतापांवर गंभीर आरोप, तर काँग्रेस नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा!
आमदार संग्राम जगताप
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 5:04 PM

मुंबई : अहमदनगर आयटी पार्कवरुन राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असं चित्र निर्माण झालं आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे यांच्यात या आयटी पार्कवरुन चांगलाच वाद रंगलाय. किरण काळे यांनी जगताप यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसंच आयटी पार्कची पाहणी करुन त्याचा भांडाफोड केवल्यानं आमदार महोदरांनी आमच्यावर एका महिलेला पुढं करुन खोटा गुन्हा दाखल केल्याचंही काळे यांनी म्हटलंय. तर काळे हे अदखलपात्र असल्याचा टोला जगताप यांनी लगावलाय. (Serious allegations against MLA Sangram Jagtap and case of molestation against Kiran Kale)

आमदार संग्राम जगताप यांनी मतदारांना दिलेली आश्वासनं खोटी ठरवण्यासाठी काळे आयटी पार्कमध्ये पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी व कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केल्याची तक्रार तिथल्या एका महिला कर्मचाऱ्यानं दिली आहे. त्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात काळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर विनयभंग आणि दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अहमदनगरमध्ये आयटी पार्क सुरु करुन तरुणांना रोजगार मिळवून दिल्याचा दावा आमदार संग्राम जगताप यांनी केला होता. काळे यांनी या आयटी पार्कची पाहणी केली आणि चित्रीकरणही केलं. तसंच तिथल्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखतीही घेतल्या. त्यानंतर जगताप यांचा दावा खोटा असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केलंय.

आमदारांना जुनीच सवय, काळेंचा टोला

आयटी पार्कच्या नावाखाली त्या ठिकाणी कॉल सेंटर चालवलं जात आहे. या कॉल सेंटरमध्ये आम्ही जबरदस्तीनं प्रवेश केला नाही. आम्ही पोलिसांची भेट घेऊन त्यांनाही हे सर्व फुटेज दाखवणार आहोत. आमचा कायदा आणि सुव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचंही काळे यांनी यांनी म्हटलंय. माता-भगिनींना, महिलांना पुढे करुन अशाप्रकारचे खोटे गुन्हे दाखल दाखल करण्याची आमदारांना जुनीच सवय आहे. त्यांनी आयटी पार्कबाबत खुली चर्चा केली असती तर लोकशाहीच्या दृष्टीनं ते योग्य ठरलं असतं, असा टोलाही काळे यांनी आमदार जगतापांना लगावलाय.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या रुपानं एकत्र सत्तेत आहेत. मात्र, जगताप आणि काळे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने आले आहेत. त्यामुळे आयटी पार्कवरुन सुरु झालेला हा वाद पुढे काय रुप घेतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संग्राम जगतापांनी शहरातील 8 सिग्नल दत्तक घेतले

अहमदनगर जिल्हा वाहतूक शाखेनं गेल्या वर्षी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कारवाई करुन दीड कोटीच्या आसपास महसूल गोळा केला होता. या निधीतून महापालिकेला सिग्नल जिर्णोद्धार निधी देण्याची मागणी जागरुक मंचाने केली होती. त्यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील 8 सिग्नल दत्तक घेतले. तसं पत्र त्यांनी जागरुक मंचाला दिलं होतं. शहरात वर्षानुवर्षे बंद असलेले सिग्नल सुरु करण्याची मागणी जागरुक मंचाकडून करण्यात येत होती. त्यानंतर कायनेटिक चौक ते प्रेमदान चौक दरम्यान राज्या महामार्गावरील 8 सिग्नलची देखभाल आणि दुरुस्ती स्वखर्चातून करणार असल्याचं जगताप यांनी त्यावेळी जाहीर केलं होतं.

इतर बातम्या :

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्वपक्षीय बैठक, काय रणनिती ठरणार?

VIDEO: अनिल देशमुखांना फरार घोषित करा, त्यांची संपूर्ण संपत्ती जप्त करा; किरीट सोमय्यांची मागणी

Serious allegations against MLA Sangram Jagtap and case of molestation against Kiran Kale

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.